आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रह्मा नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

गुरुवार 14 मे  रोजी श्रवण नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती ब्रह्मा नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

  • मेष: शुभ रंग : जांभळा | अंक : ९

कार्यक्षेत्रात रागरंग बघूनच महत्वाचे निर्णय घ्यावेत. व्यवसायात स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करून चालणार नाही.  सरकारी कामात विलंब होईल.

                 

  • वृषभ: शुभ रंग : आकाशी | अंक : ७

आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.

  • मिथुन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८

मनोबल उत्तम असेल. तुमच्यातील सकारात्मकता आज इतरांस प्रभावित करेल. शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने  प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील.

  • कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६

उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ  आहे. झटपट लाभाचा मोह आज टाळायला हवा. नोकरदारांना साहेबांच्या तसेच घरात पत्नीच्याही लहरी सांभाळाव्या लागतील.

  • सिंह : शुभ रंग : हिरवा | अंक : २

नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. विरोधकांचा जोर आता कमी होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल. 

  • कन्या : शुभ रंग : क्रिम | अंक : ४

खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता जाणवणार नाही. कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमचा उत्साह वाढवतील. मुले आज्ञेत वागतील.

  • तूळ : शुभ रंग : मोतिया | अंक : ४

दैनंदीन कामे वेळच्यावेळी पार पडतील. परिवारात आनंदाचे वातावरण राहील. काही भग्यवंतांची वास्तूविषयक स्वप्ने साकार होतील. आनंदी दिवस.

  • वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : ३

दैनंदीन कामात अडथळे येतील. आरोग्याच्या तक्रारी हैराण करतील. मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. सत्संगाने मानसिक बळ वाढवता येईल.

  • धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : १

आर्थिक अडचणींवर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील. प्रवास मात्र कंटाळवाणे होणार आहेत. प्रवासात मौल्यवान ऐवज सांभाळा.

  • मकर : शुभ रंग : पांढरा| अंक : १

किचकट कामेही विनासायास पार पडतील. नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. आज थोडयाफार आराेग्याच्या तक्रारी उदभवू शकतील.

  • कुंभ : शुभ रंग : लेमन | अंक : २

तुमच्या खर्चीक स्वभावामुळे आज पैसा कितीही आला तरी पुरणार नाही. एखादा दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. घराबाहेर वाद टाळा.

  • मीन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ५

अनपेक्षितपणे धनप्राप्ती होईल. पैशाअभावी रखडलेल्या योजना मार्गस्थ होतील. क्षुल्लक गैरसमजामुळे दूरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील.

बातम्या आणखी आहेत...