आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020 ला शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. गुरुवारी उत्तर फाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग तयार होत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
मेष : शुभ रंग : लाल| अंक : १
कार्यक्षेत्रात विरोधकांच्या कारवाया वाढलेल्या आहेत. एखादा हितशत्रू मित्रांमध्येच लपलेला असू शकतो.
वृषभ : शुभ रंग : क्रीम| अंक : ४
काही दुरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. आज मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भारावून जाल.
मिथुन : शुभ रंग : पिस्ता|अंक : २
व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. विरोधकांचा विरोध मावळेल. कार्यक्षेत्रात योग्य हितसंबंध निर्माण होतील. ध्येय साध्य करता येतील.
कर्क : शुभ रंग : मरून|अंक : ३
आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. जमाखर्चाचा मेळ घालणे जरासे अवघड जाईल.
सिंह : शुभ रंग : सोनेरी| अंक : ५
आज मनाजोगत्या घटना घडल्याने कार्यउत्साह वाढेल.महत्त्वाच्या चर्चेत अग्रेसर राहाल.
कन्या : शुभ रंग : हिरवा| अंक : ७
स्वत:चेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्याकडून हट्टीपणाने काही चुकीचे निर्णय घेतले जातील.
तूळ : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ६
आज काही पेचप्रसंगांना यशस्वीरीत्या सामोरे जाल. भक्तिमार्गात असणाऱ्यांना उपासनेचे फळ मिळेल.
वृश्चिक : शुभ रंग : राखाडी| अंक : ९
व्यवसायात उत्तम यश मिळून स्वत:चे वेगळे स्थान निर्माण होईल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.
धनू : शुभ रंग : निळा| अंक : ८
भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्याल. सहकारी तुमच्या मताचा आदर करील. इच्छित ध्येये साध्य होतील.
मकर : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ५
आज ऐकावे जनाचे व करावे मनाचे हेच धोरण हिताचे राहील. नोकरीत वरिष्ठांच्या अश्वासनांना भुलू नका.
कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३
नवीन व्यावसाय असेल तर आर्थिक धाडस करताना आपली कुवत अोळखा. कर्ज प्रस्ताव रखडतील.
मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : १
योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन याच्या जोरावर प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. वैवाहिक जीवनात आज आय लव्ह यू म्हणून टाका.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.