आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुरुवार 16 एप्रिल रोजी श्रवण नक्षत्र असल्यामुळे साध्य नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीच्या ठीकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या अपेक्षा वाढतील. स्वप्नपूर्तीसाठी कामाचे तास वाढवाल.
कार्यक्षेत्रात अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. हाताखालच्या मंडळींत मिळून मिसळूून राहणे गरजेचे आहे. मानसिक शांती सत्संगातूनच मिळेल.
आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करूच नका. हितशत्रू सक्रीय असल्याने प्रत्येक निर्णय विचारांती घ्यावा. आज स्वावलंबनाने यश सोपे होईल.
घराबाहेर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील. एखाद्या मंगल कार्यात हजेरी लावाल. आज जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.
आज तुम्हाला काही मान अपमानाच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल. दिवस तितकासा अनुकूल नसला तरीही आज काही येणी असतील तर वसूल होऊ शकतील.
नोकरदारांना आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर उत्तम संधी चालून येतील. रूग्ण ठणठणीत बरे होतील.
आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय चांगले चालतील. विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील.कलाकारांना निर्मात्यांचे उंबरठे झिजवावे लागतील.
ऑफीस कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे, वादविवाद होतील. आज गृहीणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा न ठेवलेली बरी.
आज हट्टीपणास लगाम घालून इतरांचे विचार ऐकून घेण्याचीही तयारी ठेवा. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकतील. कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाका.
आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थितीही चांगली राहील. नवविवाहीतांची स्वप्ने साकार होतील. छान दिवस.
व्यवसायातील जीवघेण्या स्पर्धेनेे जरासे नैराश्य येईल. ज्येष्ठ मंडळींनी प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे. देण्याघेण्याचे व्यवहार सावधपणे करावेत.
व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल.काही अपूरे व्यवहार पूर्ण होतील. काही दूरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाह जुळतील.
Sponsored By
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.