आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 16 एप्रिल रोजी रोहिणी नक्षत्रामुळे सौभाग्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची साथ मिळेल. या राशीच्या लोकांच्या जुन्या अडचणी दूर होऊ शकतात. नवीन लोकांसोबत ओळख होण्याचे योग आहेत. नवीन गुंतवणूक आणि फायदेशीर सौदे होऊ शकतात. नोकरी करणा-या लोकांना अधिका-यांची मदत मिळू शकते. नियोजित आणि खास काम करायची असतील तर शुक्रवार शुभ आहे. यासोबतच इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार...

मेष : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ७
पूर्वीच्या श्रमांचे चीज व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस.

वृषभ : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ६
तरुणांनी मौजमजा करताना नीतिमत्तेचे भान ठेवावे. उद्धटपणास लगाम गरजेचा आहे. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता| अंक : ८
आज पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. आपल्या अधिकारांचा दुरुपयोग टाळावा. व्यवसायात स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी हवी.

कर्क : शुभ रंग : जांभळा| अंक : ६
कौटुंबिक सदस्यांत सामंजस्य राहील. विवाहविषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य.

सिंह : शुभ रंग : सोनेरी|अंक : ५
कार्यक्षेत्रात वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत.कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे.

कन्या : शुभ रंग : चंदेरी|अंक : ६
महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे.आज तुमचा अाध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील.

तूळ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ९
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेवू नका. ताकही फुंकून प्या.

वृश्चिक : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकानदारांच्या गल्ल्यात लक्षणीय वाढ होईल. नोकरीत वरिष्ठांची कृपा राहील.

धनू : शुभ रंग : क्रीम|अंक : २
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा जोर वाढलेला आहे. नोकरीत हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागणार आहे.

मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : १
उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे तत्त्व असेल. आज चैनी व विलासी वृत्ती बळावेल.

कुंभ : शुभ रंग : मोतिया|अंक : ३
कौटुंबिक जीवन समाधानी असल्याने आज तुम्ही घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल.

मीन : शुभ रंग : मरून|अंक : ६
तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. गृहिणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...