आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार 

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 16 जुलै रोजी कृत्तिका नक्षत्र असल्यामुळे गंड नावाचा योग जुळून येत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 6 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. गुरुवकरच्या या अशुभ योगामुळे 6 राशीचे लोक जास्त तणावात राहतील. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार.... 

मेष: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६

आज आपलेच खरे करण्याकडे तुमचा कल राहील. घाईगर्दीत आज काही चुकीचे निर्णय घेतले जातील.

वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : ३

काही दूरचे नातलग संपर्कात येतील. मोठेपणा जपण्यासाठी खर्च कराल. आपल्या बोलण्याने कुणाची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.

मिथुन : शुभ रंग : जांभळा | अंक : २

आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील. आप्तस्वकीय, मित्रमंडळींत शब्दास मान राहील.

कर्क : शुभ रंग : केशरी | अंक : ४

आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल.नोकरीच्या ठीकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील.

सिंह : शुभ रंग : मोरपंखी| अंक : १

अध्यात्मिक मार्गात असणाऱ्यंना उपासनेचे फळ मिळेल. काही पेचप्रसंग यशस्वीरीत्या सोडवाल.

कन्या : शुभ रंग : आकाशी| अंक : ९

आज काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा नको.

तूळ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ४

धंद्यातील आवक जावक सेमच राहील. जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील.

वृश्चिक : शुभ रंग : निळा | अंक : १

काही आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.खाण्यावर नियंत्रण गरजेचे आहे. येणी वसूल होतील.

धनू : शुभ रंग : भगवा | अंक : ८
पारिवारीक सुखात वृध्दीच होईल. वाहन वास्तुविषयी खरेदी विक्री फायद्यातच राहील. मुलांना शिस्त लावा.

मकर : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६

आज तुम्ही कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रीत कराल. गृहीणींना आज गृहोद्योगांतून चांगली कमाई होईल.

कुंभ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ५

नोकरीच्या ठीकाणी बढती बदलीच्या बातम्या येतील.विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवल्यास यश सोपे होईल.

मीन : शुभ रंग : चंदेरी | अंक : ७

व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळून स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण होईल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.

0