आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 16 जून रोजी पूर्वाषाढा नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...

मेष : शुभ रंग : क्रिम| अंक : १
सगळयाच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील अशी अपेक्षा करु नका. कर्म करीत रहा, फळ मिळेलच.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : २
काही पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागतील. वैवाहीक जिवनांत फार अपेक्षा नकोत. चाललंय ते बरं चाललंय.

मिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : ६
कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रीत करावे लागेल. गृहीणींना आज गृहोद्योगांतून चांगली कमाई होईल.

कर्क : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३
कर्तव्यास प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रात कामाच्या प्रचंड व्यापामुळे आज महत्वाचे घरगुती प्रश्न होणार आहेत.

सिंह : शुभ रंग : सोनेरी | अंक : १
उच्चशिक्षित मंडळींना मोठया पॅकेज च्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस.

कन्या : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
कार्यक्षेत्रात स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण कराल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. गरजूंना मदत कराल.

तूळ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ८
बरेच दिवसापासून तुम्हाला अपेक्षित असलेली मेल्स येतील. शेजारी आज घरात आपुलकीने डोकावतील .

वृश्चिक : शुभ रंग : पांढरा | अंक : ६
उद्योग धंद्यातील काही येणी आकस्मिकरीत्या वसूल हाेतील. तरूण मंडळी आज बेफिकीरपणे वागतील.

धनु : शुभ रंग : आकाशी | अंक : ९
आज एखादी गोष्ट फारच मनाला लाऊन घ्याल.विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील.

मकर : शुभ रंग : निळा| अंक : ५
ज्येष्ठ मंडळी तिर्थाटनाचे बेत आखतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवणे गरजेचे आहे. यश सोपे नाही.

कुंभ : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
सर्व दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. समोरील व्यक्तीवर तुमचा प्रभाव राहील. गुड न्यूज येतील.

मीन : शुभ रंग : जांभळा| अंक : ४
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवची हमखास साथ मिळेल. श्रध्दाळूंना उपासनेचे फळ मिळेल.

बातम्या आणखी आहेत...