आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 17 डिसेंबर रोजी उत्तराषाढा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजच्या ग्रह-स्थितीनुसार ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...

मेष: शुभ रंग : डाळिंबी| अंक : ७
नोकरदारांना काही जुन्या चुका निस्तराव्या लागतील. दैनंदिन कामातही काही समस्यांना तोंड द्यावे लागेल.

वृषभ: शुभ रंग : डाळिंबी| अंक : ९
उद्योग-व्यवसायात काहीसे प्रतिकूल वातावरण असणार आहे. आज केवळ भिडस्तपणाने आपल्या आवाक्याबाहेरील जबाबदाऱ्या स्वीकारूच नका.

मिथुन : शुभ रंग : मरून| अंक : ८
विवाहेच्छुकांना सुयोग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. आज एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर पत्नीशी चर्चा करणे हिताचे राहील. नाेकरीत आज वरिष्ठांचे उत्तम सहकार्य राहील.

कर्क : शुभ रंग : हिरवा| अंक : ६
कार्यक्षेत्रात काही झटपट लाभाच्या संधी येतील, पण मनावर संयम ठेवणे हिताचे राहील. प्रतिष्ठेस जपावे.

सिंह :शुभ रंग : पांढरा| अंक : ४
उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. कलेच्या क्षेत्रात नवोदितांची हौस भागेल. किमती वस्त्र खरेदी कराल.

कन्या : शुभ रंग : पिस्ता| अंक : ५
आज काही कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. विद्यार्थी अभ्यासात एकाग्रता साधू शकतील.

तूळ : शुभ रंग : भगवा| अंक : ३
आवडत्या क्षेत्रात नेतृत्वाची संधी मिळेल. बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. आज घराबाहेर वाद टाळावेत.

वृश्चिक : शुभ रंग : मोतिया| अंक : १
तुमची आर्थिक कुवत वाढणार आहे. मानसिक स्थिती चांगली असल्याने तुमची कार्यक्षमताही चांगली असेल.

धनु : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ९
कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पूर्ण कराल.

मकर : शुभ रंग : राखाडी|अंक : २
असा खर्च उद्भवेल की जो टाळता येणे शक्य नाही. घरातील थोरांचे सल्ले विचारात घेणे गरजेचे आहे.

कुंभ : शुभ रंग : आकाशी|अंक : ४
अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. संततीबाबत काही आनंददायी घटना घडणार आहेत. छान दिवस.

मीन : शुभ रंग : निळा| अंक : ७
कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आज स्वप्नरंजनापेक्षा अथक प्रयत्नांस प्राधान्य देणे गरजेचे आहे. व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल.

बातम्या आणखी आहेत...