आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 17 मार्च रोजी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती शूल नावाचा अशुभ योग तयार करत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 6 राशींसाठी दिवस संकटाचा राहू शकतो. शूल योगात केलेले कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही. यामुळे शास्त्रानुसार या दिवशी महत्त्वाची कार्ये टाळणेच चांगले. इतर 6 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : हिरवा | अंक : ७
आज बऱ्याच दिवसानी तुम्ही जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात रमाल. गृहीणी आवडत्या छंदास वेळ देतील.

वृषभ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
आज मुलांची अभ्यासातील प्रगती  तुम्हाला आनंद देेईल. संध्याकाळी सहकुटुंब चैन कराल. आनंदी दिवस

मिथुन : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होईल. घर दुरूस्ती तसेच वाहन दुरूस्तीचा खर्च उद्भवण्याची शक्यता.

कर्क : शुभ रंग : लाल | अंक : १
आज तुमची आर्थिक स्थिती भक्कम असून मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. शेजारी रूसतील.

सिंह : शुभ रंग : केशरी | अंक : ३
कार्यक्षेत्रात पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश सोपे झाल्याचे जाणवेल. याेग्य माणसे संपर्कात येतील.

कन्या : शुभ रंग : निळा| अंक : २
तरुणांनी मौजमजा करताना नितिमत्तेचे भान ठेवावे. उध्दटपणास लगाम गरजेचा आहे. कायदा पाळा.

तूळ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
नोकरीच्या शोधात असाल तर इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल. विवाह विषयी बोलणी होकारार्थी पार पडतील.

वृश्चिक : शुभ रंग : भगवा| अंक : ५
अथक प्रयत्नांच्या जोरावर तुमची आज ध्येयाकडे वाटचाल सुरु राहील. व्यवसायात भिडस्तपणास नको.

धनु : शुभ रंग : आकाशी| अंक : २
कार्यक्षेत्रात आज महत्वपूर्ण निर्णय घेताना अनुभवी मंडळींचा सल्ला घेणे गरजेचे राहील. धाडस टाळा.

मकर : शुभ रंग : क्रिम| अंक : ३
अनपेक्षित मोठे खर्च उद्भवल्याने आर्थिक ओढाताण संभवते. वैवाहीक जिवनांत जोडीदाराच्या मताने घ्या.

कुंभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
रिकामटेकड्या चर्चेतून वाद होण्याची शक्यता आहे. समोरच्या व्यक्तीस मूर्ख समजण्याची चूक करू नका.

मीन : शुभ रंग : मरून | अंक : ९
तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. हितशत्रू मित्रांमधेही लपलेले असू शकतात सतर्क रहा.

बातम्या आणखी आहेत...