आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021 ला शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. गुरुवारी भरणी नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग तयार होत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...

मेष : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ३
आज रिकामटेकड्या चर्चेतून वाद होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे मन समजून घ्या.

वृषभ : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ४
अनपेक्षित मोठे खर्च उद्भवल्याने आर्थिक ओढाताण संभवते. वडीलधाऱ्यांशी मतभेद होतील. पण त्यांच्या वयाचा मान राखाल. प्रवास करताना वस्तू सांभाळा.

मिथुन : शुभ रंग : क्रीम| अंक : ५
व्यापारी वर्गाची आवक वाढेल. पूर्वीच्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरी पडेल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही आज तुम्ही भारावून जाल. मस्त दिवस.

कर्क : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
आज वेळेअभावी कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होऊ शकते. थोरामोठ्यांच्या शब्दास मान द्यावा लागेल.

सिंह : शुभ रंग : आकाशी|अंक : ९
कार्यक्षेत्रात स्पर्धा अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. ज्यात कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका.

कन्या : शुभ रंग : भगवा|अंक : ८
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी नमते घ्यावे लागेल.वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना थकवा जाणवेल.

तूळ : शुभ रंग : गुलाबी| अंक : २
तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा फोन येईल. विवाहविषयक बोलणी सकारात्मकतेने पार पडतील.

वृश्चिक : शुभ रंग : जांभळा|अंक : ६
आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीकडे दुर्लक्षित करू नका. उतावीळपणे कोणतेही निर्णय घेणे योग्य नाही.

धनू : शुभ रंग : पिस्ता| अंक : १
एखादा नवा विषय शिकण्याची संधी मिळेल. कवी प्रेमगीते लिहितील. गृहिणी सौंदर्याची काळजी घेतील.

मकर : शुभ रंग : मरून| अंक : ५
अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास प्राधान्य द्या. आज मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावेे लागेल.

कुंभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ४
आज तुम्ही आपल्या मर्यादा ओळखून वागणेच हिताचे राहील. घराबाहेर वावरताना क्रोधावर लगाम गरजेचा.

मीन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : १
हातात पैसा राहील. आवडत्या क्षेत्रात नेतृत्व करू शकाल. मनसोक्त खर्च करून चैनी व विलासी वृत्तीस खतपाणी घालाल.

बातम्या आणखी आहेत...