आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य :जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुकर्मा नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

गुरुवार 18 जून रोजी भरणी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती सुकर्मा नावाचा शुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

मेष: शुभ रंग : डाळिंबी | अंक : ६

तुमचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. देण्याघेण्याचे व्यवहार मात्र काळजीपूर्वक करावेत.


वृषभ: शुभ रंग : मोरपंखी | अंक : २

काही अत्यावश्यक खर्च हात जोडून उभे असतील.बचतीचा विचार आज तरी सोडूनच द्या. घरातील थोर मंडळी आपलेच खरे करतील. कमीच बोला.     


मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : १

व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल.काही अपूरे व्यवहार पूर्ण होतील. काही दूरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाह जुळतील. 


कर्क : शुभ रंग : सोनेरी | अंक : ३

कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीच्या ठीकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. आज कृतीस प्राधान्य द्याल. 


सिंह : शुभ रंग : चंदेरी | अंक : २

कार्यक्षेत्रात अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. मानसिक शांती आज सत्संगातूनच मिळेल. 


कन्या : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४

तुमच्याकडून अधिकारी वर्गाच्या अपेक्षा वाढतील. हाताखालच्या मंडळींत मिळून मिसळूून राहणे गरजेचे.


तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १

आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करूच नका. आज स्वावलंबनाने यश सोपे होईल. वादविवाद टाळा.


वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५

आज घराबाहेर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव  राहील. एखाद्या मंगल कार्यात हजेरी लावावी लागेल. 


धनू :  शुभ रंग : केशरी  | अंक : ९

आज तुम्हाला काही मान अपमानाच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल. काही येणी असतील तर वसूल होतील.


मकर : शुभ रंग : जांभळा  | अंक : ७

नोकरदारांना  कंटाळवाणी कामे करावी लागतील. रूग्ण आज  ठणठणीत बरे होतील. अनुकूल दिवस.


कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ६

शैक्षणिक क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय चांगले चालतील. विद्यार्थ्यांची अभ्यासतील प्रगती कौतुकास्पद राहील.


मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ८

ऑफीस कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे, वादविवाद होतील. प्रत्येक निर्णय विचारांती घ्या.  

0