आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • साध्य नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात
Advertisement
Advertisement

गुरुवार 2 जून रोजी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे साध्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

मेष: शुभ रंग : मरून | अंक : ३

कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका. आज वेट अँड वॉच चे धोरण ठेवा. आज प्रतिकूल दिवस.

वृषभ: शुभ रंग : गुलाबी | अंक : ८

आज धंद्यातील आवक जावक सेम सेमच राहील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहीणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदीत होतील.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ७

काही आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे. येणी असतील तर मागा, म्हणजे वसूल होतील. रूग्णांनी पथ्य सांभाळावे.

कर्क :  शुभ रंग : मोतिया| अंक : ९

पारिवारीक सुखात वृध्दी  होईल. वाहन  वास्तुविषयी  खरेदी विक्री फायद्यात राहील. मुलांना  शिस्त लावायला हवी. 

सिंह : शुभ रंग : राखाडी | अंक : ४

आज तुम्ही कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रीत कराल. गृहीणींना गृहोद्योगांतून चांगली कमाई होईल. 

कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १

नोकरीच्या ठीकाणी बढती बदलीच्या बातम्या येतील.विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत. यश सोपे नाही.

तूळ : शुभ रंग : डाळींबी | अंक : ५

व्यवसायात उत्तम यश मिळून स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण होईल. आज प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.

वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३

स्वत:चेच  खरे करण्याकडे आज तुमचा कल राहील. आज घाईगर्दीत काही चुकीचे निर्णय घेतले जातील.

धनू : शुभ रंग : पांढरा| अंक : १

मोठेपणासाठी खर्च कराल. सडेतोड बोलण्याने कुणाची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.

मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : २

यशस्वी व्यक्तींच्या सहवासात  महत्वाकांक्षा वाढतील. आप्तस्वकीय, मित्रमंडळींत तुमच्या शब्दास मान राहील.

कुंभ : शुभ रंग : मोरपीशी | अंक : ५

आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल. सहकारी तुमचा आदर करील. ध्येय साध्य होतील.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६

आज काही पेचप्रसंगांना यशस्वीरीत्या सामोरे जाल.प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची हमखास साथ मिळेल.

Advertisement
0