आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 21 जानेवारी रोजी अश्विनी नक्षत्र असल्यामुळे साध्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील...

येथे जाणून घ्या तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...

मेष: शुभ रंग: चंदेरी| अंक : ५
व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. महत्वाच्या चर्चेत अग्रेसर रहाल. ध्येयाकडे वेगात वाटचाल होईल.

वृषभ: शुभ रंग: गुलाबी| अंक : २
आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. जमाखर्चाचा मेळ घालणे आज जरासे अवघड जाईल.

मिथुन : शुभ रंग : सोनेरी| अंक : ९
पैसा येण्याचे मार्ग प्रशस्त होणार आहेत. भावनेच्या भरात कुणाला शब्द दिले असतील तर ते पाळता येतील. नेते मंडळींची समाजात लोकप्रियता वाढेल.

कर्क : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
आज स्वावलंबन महत्वाचे असेल. योग्य वेळी अधिकर वापरावे लागतील. जवळच्या मित्रांमधे वितुष्ट संभवते.

सिंह :शुभ रंग : मरून|अंक : १
नोकरदारांनी आज साहेबांच्या फार मागेपुढे करण्यापेक्षा सहकाऱ्यांशी मिळून मिसळून राहणे हिताचे राहील.

कन्या : शुभ रंग : हिरवा|अंक : ७
काही अप्रिय घटना मनास बेचैन करतील. वैवाहीक जिवनांत संध्याकाळी क्षुल्लक मतभेद फार ताणू नका.

तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : १
आर्थिक स्थिती उत्तम असून तुमचा मूडही चांगला असेल. सहकुटुंब चैन कराल. मुलांचे लाड पुरवाल.

वृश्चिक : शुभ रंग : जांभळा| अंक : ३
महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे.कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे.

धनु : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे हिताचे. तरुणांनी उध्दटपणास लगाम घालायला हवा.

मकर : शुभ रंग : आकाशी| अंक : २
कौटुंबिक जिवन समाधानी असल्याने तुम्ही घराबाहेरही आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवू शकाल. छान दिवस.

कुंभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ५
आज भावंडांमधे सामंजस्य राहील. गृहीणींना शेजारधर्म पाळावे लागतील. आज जास्त वेळ घराबाहेरच जाईल.

मीन : शुभ रंग : क्रिम| अंक : ६
आज आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत रहाल. हौसमौज जरूर करा पण आपल्या मर्यादा सांभाळा. कुसंगतीपासून लांबच रहा.

बातम्या आणखी आहेत...