आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सौभाग्य आणि शोभन नावाच्या 2 शुभ योगामध्ये दिवसाची सुरुवात, या 8 राशीच्या लोकांसाठी अत्यंत खास राहील गुरुवार

गुरुवार 21 मे  2019 ला भरणी  नक्षत्र असल्यामुळे सौभाग्य आणि शोभन नावाचे 2 शुभ योग जुळून येत आहेत. याच्या प्रभावाने 12 पैकी 4 राशीचे लोक विविध कामामध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. प्रगती होण्याचे योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आणि रिस्क घेऊन कोणतेही काम करू नये...

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

मेष: शुभ रंग : पांढरा | अंक : ३

महत्वाच्या चर्चेत इतरांची मते समजून घ्या. आपलेच खरे करण्याचा अट्टहास नको. तब्येत थोडी नरम असेल.

वृषभ: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६

आज स्वत:ची हौसमौज भागवण्यासाठी सढळ हस्ते खर्च कराल. जमाखर्चाचा ताळमेळ साधताना तारेवरची कसरत होईल. घराबाहेर वादविवाद नकोत.

मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : २

समाजात व मित्रमंडळींत मानमतराब वाढेल. एखाद्या सामाजिक कार्यात तुमचं योगदान द्याल. व्यापाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. नवे उपक्रम बिनधास्त सुरू करा.

कर्क : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १

रिकाम्या गप्पा मारण्यापेक्षा कृतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. घराबाहेर कायद्याचे पालन गरजेचे.

सिंह : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३

नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण जाणवेल. आज उद्योग-व्यवसायाच्या दृष्टीने थोडे विरोधी ग्रहमान आहे. 

कन्या : शुभ रंग : अबोली | अंक : ५

कष्टांच्या प्रमाणात मोबदला जेमतेम राहील. घराबाहेर रागीट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

तूळ : शुभ रंग : मोतिया | अंक : ६

कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. मोठ्या लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. छान दिवस.

वृश्चिक : शुभ रंग : केशरी | अंक : ४

व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. आज व्यग्र दिवस.

धनू : शुभ रंग : आकाशी| अंक : ८

योग्य माणसे संपर्कात येतील. अथक परिश्रमांच्या साहाय्याने प्रगतीची चक्रे गतीमान ठेवता येतील.

मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५

आज काही महत्वाचे निर्णय घेताना तुमची द्विधा मन:स्थिती होईल. प्रामाणिक प्रयत्नांस यश मिळेल.

कुंभ : शुभ रंग : भगवा | अंक : ७

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.

मीन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९

आज तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. ज्येष्ठांना उत्तम प्रकृती स्वास्थ लाभेल.

बातम्या आणखी आहेत...