आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 22 एप्रिल रोजी आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे गंड नावाचा योग जुळून येत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 6 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. गुरुवारच्या या अशुभ योगामुळे 6 राशीचे लोक जास्त तणावात राहतील. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...

मेष: शुभ रंग : केशरी | अंक : ४
पैशाअभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील. आत्मविश्वासाने नव्या योजना राबवता येतील. स्पर्धकांना तुमचा हेवा वाटेल. गरजूंना मदत कराल.

वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : ३
आज जोखमीची कामे टाळलेली बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. घराबाहेर वादविवाद टाळा.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८
आज काही मोठे खर्च दार ठोठावणार आहेत. अध्यात्मिक मार्गाकडे आज तुमचा कल राहील.

कर्क : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९
हट्टीपणास लगाम घालून. इतरांचेही विचार ऐकून घ्या. आज तुम्ही भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकतील. कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकणे गरजेचे आहे.

सिंह : शुभ रंग : राखाडी | अंक : ७
नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढणार आहे. वरीष्ठ गोड बोलून तुमच्याकडून कामे करून घेतील.

कन्या : शुभ रंग : हिरवा | अंक : ८
आज हातचे सोडून पळत्या मागे अजिबात धावू नका व कायद्याची चौकट मोडू नका.

तूळ : शुभ रंग : लाल | अंक : ६
कार्यक्षेत्रात तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू राहील. सहजच घेतलेले निर्णयही योग्यच ठरतील.

वृश्चिक : शुभ रंग : मोरपिशी| अंक : ५
आज तुम्ही अत्यंत आनंदी, उत्साही व ताजेतवाने असाल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. छान दिवस.

धनू : शुभ रंग : मरून| अंक : ४
काही कौटुंबिक अडचणी तुम्हाला चिंताग्रस्त करतील. प्रक़ृतीकडे दुर्लक्ष नको. जोडीदाराचे मन समजून घ्यावे.

मकर : शुभ रंग : क्रिम | अंक : २
बरेच दिवसांपासूनची तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होणार आहेत. नोकरीत बदलाच्या संधी.

कुंभ : शुभ रंग : आकाशी | अंक : १
आर्थिक बाजू उत्तम असेल. आज घरसजावटीच्या काही शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल. आज मुलांना दिलेले शब्द पाळू शकाल.

मीन : शुभ रंग : निळा| अंक : ३
एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल व त्या संधीचे तुम्ही सोने कराल. दिवस कष्टांचा.

बातम्या आणखी आहेत...