आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 23 जून रोजी रेवती नक्षत्रामुळे अतिगंड नावाचा योग तयार होत आहे. याचा अशुभ प्रभाव जवळपास 12 पैकी 6 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. गुरुवारच्या या अशुभ योगामुळे सहा राशीचे लोक जास्त तणावात राहतील. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...

मेष : शुभ रंग : भगवा| अंक : ५
आज दुनियादारी करण्यापेक्षा स्वत:च्या स्वार्थाकडे लक्ष असुद्या. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.

वृषभ : शुभ रंग : क्रिम| अंक : ३
पैशाची कमतरता जाणवणार नाही. आज घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचाही प्रभाव पडेल.

मिथुन : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
आज अथक परिश्रमांच्या सहाय्याने प्रगतीची चक्रे गतीमान ठेऊ शकाल. योग्य माणसे संपर्कात येतील.

कर्क : शुभ रंग : मरून | अंक : ९
शासकिय कामे रखडतील. श्रध्दाळू गृहीणींचा देवधर्म चालूच राहील. आज देवही नवसाला नक्की पावेल.

सिंह : शुभ रंग : हिरवा | अंक : ७
शारिरीक कष्ट करणाऱ्यांनी आज तब्येतीची काळजी घ्यावी. मानापमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल.

कन्या : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
आनंदी व उत्साही असा आज दिवस असून सर्व कामे सुरळीत पार पडतील. गृहसौख्याचा दिवस.

तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
दैनंदीन कामात काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी चालून येतील.

वृश्चिक : शुभ रंग : लाल | अंक : १
तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. हौशी मंडळींना चैन करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल.

धनु : शुभ रंग : केशरी | अंक : ३
आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल.

मकर : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
आज घराबाहेर वावरताना क्रोधावर लगाम गरजेचा आहे. तुमची काही गुपिते उघड होतील. कमीच बोला.

कुंभ : शुभ रंग : निळा| अंक : २
व्यवसायात तुम्ही वाढत्या स्पर्धेचा सामना करायला समर्थ असाल. जोडीदाराची भक्कम साथ राहील.

मीन : शुभ रंग : आकाशी| अंक : २
आप्तस्वकीयांचा सहवास लाभेल. क्षुल्लक वाद विवादाचे प्रसंग उद्भवतील. आज मनावर ताबा ठेवा.

बातम्या आणखी आहेत...