आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 24 नोव्हेंबरची सुरुवात अशुभ योगामध्ये होत आहे. अनुराधा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती अतिगंड नावाचा अशुभ योग तयार करत आहे. अशुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 6 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. व्यर्थ धावपळ आणि तणावाची स्थिती राहील. खर्च वाढेल. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष | शुभ रंग:डाळींबी, शुभ अंक : २
आज आपल्या मर्यादेत राहीलेले बरे. धाडसाची कामे आज टाळलेली बरी. सासुरवाडी कडून एखादा लाभ संभवतो. आज जोडीदार जे म्हणेल त्याला होच म्हणा.

वृषभ | शुभ रंग: मरून, शुभ अंक : ४
भागिदारीच्या व्यवसायांत देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा. वैवाहीक जिवनांत जुन्या फोटोंचा अलबम चाळून बघा. दूरच्या प्रवासात काही वेळ खोळंबा संभवतो.

मिथुन | शुभ रंग:गुलाबी, शुभ अंक : १
ध्येयप्राप्ती साठी तुमचे अथक परिश्रम चालू असून तब्येतीकडे दुर्लक्ष होत आहे. आज तुम्हाला विश्रांतीची गरज भासेल. विद्यार्थ्याना स्पर्धेत हमखास यश मिळेल.

कर्क | शुभ रंग: पिस्ता, शुभ अंक : ८
उच्चशिक्षण घेणाऱ्यांच्या महत्वाकांक्षा वाढतील. विद्यार्थी पालकांच्या अपेक्षा पुर्ण करतील. आज सहकुटुंब एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. छान दिवस.

सिंह | शुभ रंग: सोनेरी, शुभ अंक : ९
आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस. कुठेही न जाता घरी आराम करावासा वाटेल. गृहीणी आज घरस्वछतेचे मनावर घेतील. मुलांच्या शिस्तीस प्राधान्य द्यायला हवे.

कन्या | शुभ रंग: पांढरा, शुभ अंक : ७
स्थावर विषयक मोठे आर्थिक व्यवहार टाळा. आज प्रवासात काही नवी नाती जुळतील. आज काही अती हुषार मंडळीही संपर्कात येतील. डोके शांत ठेवा.

तूळ | शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : ४
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. मृदु वाणीने विरोधकांनाही आपलेसे कराल. आज नेत्याची वक्तव्ये जनमानसांवर प्रभाव टाकतील. आशादायी दिवस.

वृश्चिक | शुभ रंग: स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ६
आज कुठेही आपलेच खरे करण्याचा तुमचा प्रयत्न राहील. काही क्षुल्लक गोष्टींवरून राग तुम्हाला राग येईल. महत्वाच्या चर्चेत आपलेच घाडे पुढे दामटवाल.

धनु | शुभ रंग: लाल, शुभ अंक : ५
बेरोजगारांना घरापासून लांब नोकरीच्या संधी येतील. अधिकारी वर्गास कार्यालयिन कामासाठी प्रवास घडतील. दुकानदारांनी उधारी उसनवारी टाळावी.

मकर | शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : २
अानंदी व उत्साही असा दिवस असून काही दूरावलेली नाती जवळ येतील. काही भाग्यवान मंडळींना नव्या घराचा ताबा मिळेल. अपुरी स्वप्ने साकार होतील.

कुंभ | शुभ रंग:मोरपिशी, शुभ अंक : १
आज आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी गौण असतील. नोकरदारांना वरीष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. मित्र मंडळींना आज दोन हात लांबच ठेवा.

मीन | शुभ रंग:आकाशी, शुभ अंक : ३
नोकरीच्या ठीकाणी असलेले नियम मोडून चालणार नाहीत. वरीष्ठांना खूष करण्यासाठी तारेवरची कसरत होईल. मन:शांतीसाठी सत्संगाशिवाय पर्याय नाही.

बातम्या आणखी आहेत...