आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुभ योगामध्ये होत आहे फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या गुरुवारची सुरुवात. पुष्य नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. आजच्या ग्रहस्थितीचा लाभ 12 पैकी 6 राशीच्या लोकांना होईल. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...

मेष : शुभ रंग : मरून| अंक : २
संमिश्र फळे देणारा दिवस असून आज काम कमी व धावपळच जास्त होईल. भावंडांत सामंजस्य राहील.

वृषभ : शुभ रंग : भगवा| अंक : १
कार्यक्षेत्रात मानसन्मान वाढेल. अनपेक्षित लाभ मनाला दिलासा देतील. उपवरांना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील.

मिथुन : शुभ रंग : चंदेरी| अंक : ८
मनाच्या लहरीपणास थोडासा लगाम गरजेचा आहे. अति महत्त्वाकांक्षांना ब्रेक लावून तब्येतीवरही लक्ष देणे गरजेचे आहे. जोडीदाराशी सामंजस्य राहील.

कर्क : शुभ रंग : गुलाबी| अंक : ९
काही अत्यावश्यक खर्च करावेच लागतील. बचत आज जमणार नाही. घरातील थोर हट्टीपणाने वागतील.

सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ७
राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण आर्थिक सुबत्ता देईल. आज तुमचा उत्साह व कार्यक्षमता वाढेल.

कन्या : शुभ रंग : सोनेरी|अंक : ६
नोकरीच्या ठिकाणी अधिकारात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. मित्र अाश्वासने पाळणार नाहीत.

तूळ : शुभ रंग : आकाशी| अंक : ५
नोकरीत बिनचूक कामास प्राधान्य द्या. रिकाम्या गप्पांतून फक्त गैरसमज वाढतील. आज दैवाची साथ आहेच.

वृश्चिक : शुभ रंग : राखाडी| अंक : ६
काही फसव्या संधी येतील, हातचे सोडताना विचार करा. मेहनतीच्या प्रमाणात मोबदला कमीच राहील.

धनु : शुभ रंग : पिस्ता| अंक : २
तुमची तब्येत जरी नरम असली तरी कामातील उत्साह दांडगा राहील. व्यावसायिकांची आवक उत्तम राहील.

मकर : शुभ रंग : पांढरा| अंक : ३
मानापमानाच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल. थोडी संयमाची कसोटी राहील. क्रोधावर लगाम गरजेचा.

कुंभ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ४
उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्त्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल. उत्साही दिवस.

मीन : शुभ रंग : निळा| अंक : १
काही जुनी रेंगाळलेली प्रकरणे मार्गी लागतील. पार्लर्स फोटोग्राफी, मॉडेलिंग सारखे व्यवसाय तेजीत चालतील.मातोश्रींकडून लाभ संभवतो.

बातम्या आणखी आहेत...