आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हर्षण नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

गुरुवार 25 जून रोजी आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

मेष : शुभ रंग : केशरी | अंक : ७

प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या कामातील विघ्नं दूर होतील. विद्यार्थी अभ्यास मनावर घेतील. गर्भवतींना सुदृढ संततीचा लाभ होईल. कलाकारांचे कौतुक होईल.

वृषभ : शुभ रंग : पांढरा | अंक : २

भावना व कर्तव्य याचा मेळ घालणे कठीण जाईल. महत्वाकांक्षांच्या आहारी जाताना आपल्या मर्यादाही ओळखणे गरजेचे आहे. गृहीणींना माहेरची ओढ लागेल.

मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : १ 

रिकामटेकडया चर्चा टाळा कारण त्यातून निष्पंन्न काहीच होणार नाही. आज शेजारी अडचणीत मदत करायला धावून येतील. वाहन दुरुस्तीचा खर्च उद्भवू शक्यताे.

कर्क : शुभ रंग : निळा | अंक : ५

आर्थिक बाजू भक्कम राहील. योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन कामी येईल. पूर्वीच्या गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल. वादविवादात सरशी होईल.

सिंह : शुभ रंग : जांभळा | अंक : ३

व्यवसायात कामाचे तास वाढवावे लागतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या काही तत्वांना मुरड घालावी लागेल. अहंकार टाळून हितसंबंध जपणे गरजेचे आहे.

कन्या : शुभ रंग : पिवळा | अंक : ४ 

आज तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांना घरापासून लांब कामाच्या संधी येतील. उच्चशिक्षितांना विदेश गमनाच्या संधी खुणावतील. खर्च वाढणार आहे.

तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६

आज तुम्ही मित्रमंडळींत आपला मोठेपणा सिध्द करण्यासाठी सढळ हस्ते पैसा खर्च कराल. सायंकाळी एखाद्या चित्रपटाचा आस्वाद घ्याल. आनंदी दिवस.

वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : ७

व्यवसायात पूर्वीचे नियम बदलावे लागणार आहेत. मागणी तसा पुरवठा करणे गरजेचे आहे. काही मोठया लोकांच्या ओळखी आपल्या स्वर्थासाठी वापरून घ्या.

धनू : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६

नोकरीत उच्च्पदस्त असाल तर काही पेचप्रसंग सोडवावे लागतील. काही मनस्ताप देणारी मंडळीही भेटणार आहेत. हाताखालच्या लोकांशी मिळून मिसळून रहावे.

मकर : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८

थोडेफार नैराश्य जाणवेल. काही क्षुल्लक गोष्टी कारण नसताना मनाला लावून घ्याल. भिडस्तपणा मुळे काही चांगल्या संधी हातातून निसटू शकतील.

कुंभ : शुभ रंग : अबोली | अंक : ५ 

ऐकावे जनाचे पण करावे मनाचे असेच तुमचे आज धोरण असेल. मोफत सल्ला देणाऱ्या मंडळींच्या नादी लागू नका, परंतू आज पत्नीचा सल्ला डावलू नका.

मीन : शुभ रंग : क्रिम | अंक : ९

आज काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील. जुने आजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे.काही येणी असतील तर वसूल होऊ शकतील.

बातम्या आणखी आहेत...