आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुरुवार 25 मार्च रोजी आश्लेषा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती सुकर्मा नावाचा शुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...
मेष : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
फक्त मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. मागून नावे ठेवणाऱ्या मंडळींकडे दुर्लक्ष करा.
वृषभ : शुभ रंग : गुलाबी| अंक : १
आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती करावी लागेल. घराबाहेर वावरताना रागावर ताबा ठेवावा. मित्रांना पार्टी आज नको. मोहास लगाम गरजेचा.
मिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : ३
व्यवसायात मनाजोगती धनप्राप्ती होईल. परिवारात सामंजस्य राहील. मुलांना अभ्यासाची गोडी लागेल. काही खोटी स्तुती करणारी मंडळी भेटतील, सतर्क राहा.
कर्क : शुभ रंग : पांढरा| अंक : २
अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. विवाह विषयक बोलणी सकारात्मकतेने पार पडतील.
सिंह : शुभ रंग : लाल|अंक : ६
घरातल्या थोर मंडळींचे उपदेश ऐकून बोअर व्हाल. आज तुम्हाला एकांताची गरज भासणार आहे.
कन्या : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ७
कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कष्टांची फळे मिळतील. नवे हितसंबंध तयार होतील. दिलेले शब्द पाळाल.
तूळ : शुभ रंग : क्रिम| अंक : ५
तुमच्या कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढलेला तुमच्या लक्षात येईल. आज कामातील चुका टाळा.
वृश्चिक : शुभ रंग : आकाशी| अंक : ८
काही क्षुल्लक अडचणींनी नैराश्य येण्याची शक्यता आहे. व्यावसायिक महत्त्वाचे करार उद्यावर ढकला.
धनू : शुभ रंग : जांभळा|अंक : १
कुठलीही गोष्ट सहज साध्य नाही. अथक परिश्रम गरजेचे. पत्नीकडे मन मोकळे करताना हातचे राखून बोला.
मकर : शुभ रंग : मरून|अंक: ९
उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण राहील. हौसमौज करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल.
कुंभ : शुभ रंग : आकाशी| अंक : ६
नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर होतील. येणी वसूल होतील.
मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ४
आज तुम्ही आनंदी व प्रसन्नचित्त असाल. बऱ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. मुलांची वागणूक समाधान देईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.