आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुरुवार, 26 नोव्हेंबरला सर्वार्थसिद्धी नावाचा योग जुळून येत आहेत. यासोबतच आज रेवती नक्षत्र असल्यामुळे मित्र नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. गुरुवारी रात्री चार मीन राशीतून मेष राशीमध्ये प्रवेश करेल. आजच्या ग्रहस्थितीचा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...
मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : १
मन चंचल राहील. हातचे सोडून मृगजळामागे धावण्याचा मोह होईल. तसे न करणे हिताचे राहील.
वृषभ : शुभ रंग : मरून| अंक : ३
योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांचे चीज होईल. व्यवसायात आवक मनाजोगती असेल. पैशाअभावी रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मित्रमंडळीत मोठेपणा मिळेल.
मिथुन : शुभ रंग : सोनेरी| अंक : ५
आज तुम्हाला वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येण्याची शक्यता आहे. बेकायदेशीर कृत्ये अंगाशी येऊ शकतात. आज मित्रांच्या फार नादी लागूच नका.
कर्क : शुभ रंग : चंदेरी| अंक : ६
आज कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच असेल. काही कामे आज नि:स्वार्थीपणे करावी लागणार आहेत.
सिंह : शुभ रंग : गुलाबी| अंक : ७
नवीन उपक्रम सुरू करायचे असतील तर आजचा दिवस योग्य नाही. आज कष्टांचाही अतिरेक टाळा.
कन्या : शुभ रंग : आकाशी| अंक : ९
धंद्यात आवक-जावक सारखीच राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची मते विचारात घेणे गरजेचे आहे.
तूळ : शुभ रंग : निळा|अंक : ६
नोकरीत वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भावना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल. संयम ठेवा.
वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ८
जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदित होतील.
धनू : शुभ रंग : पांढरा|अंक : २
आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत.
मकर : शुभ रंग : क्रीम| अंक : ४
पैशाची उधळपट्टी थांबवणे गरजेचे आहे. आज काही अति आवश्यक खर्च हात जोडून उभे राहू शकतात.
कुंभ : शुभ रंग : नारिंगी|अंक : ३
व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळून स्वत:चे वेगळे स्थान निर्माण होईल. आज गरजूंनाही मदत कराल.
मीन : शुभ रंग : मोरपंखी|अंक : १
आज तुम्ही काहीसे बेफिकीरपणे वागाल. स्वत:चेच खरे करण्याकडे तुमचा कल राहील. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.