आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ध्रुव नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

गुरुवार 28 मे रोजी पुष्य नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजच्या ग्रह-स्थितीनुसार ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

मेष: शुभ रंग : भगवा | अंक : ४

कार्यक्षेत्रात तुमची वाटचाल यशाच्या दिशेने चालूच राहील. मुलांना वेळ देण्याचा तुमचा प्रयत्न राहील.

वृषभ: शुभ रंग : मरून | अंक : १

आर्थिक बाजू उत्तम असेल. मुलांना दिलेले शब्द पाळू शकाल. वाहनाचीही काळजी घ्यावी लागेल. गृहीणी आज घराच्या स्वच्छतेचे मनावर घेतील.

मिथुन : शुभ रंग : मोतिया | अंक : २

काही कौटुंबिक प्रश्न तुम्हाला चिंताग्रस्त करतील. परंतु जोडीदाराच्या खंबीर सहकार्याने त्यावर सहज मात करता येईल. काही कारणास्तव प्रवास घडतील.

कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३

तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्यच ठरणार आहेत. आज प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.

सिंह : शुभ रंग : लाल | अंक : ९

नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढणार आहे. आज प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. पत्नीची आज्ञा पाळणे हिताचे.

कन्या : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५

आज मिळेल त्या संधीचे तुम्ही सोने कराल. बरेच दिवसांपासूनची काही अपुरी स्वप्ने साकार होतील.

तूळ : शुभ रंग : राखाडी | अंक : ८

आज कोणतेही महत्त्वाचे निर्णय घाईगर्दीत घेऊ नका. कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकणे गरजेचे आहे.

वृश्चिक : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ७

घरात वडीलधारी मंडळी हट्टीपणाने वागतील. त्यांच्या वयाचा मान राखाल. अधिकारांचा गैरवापर करू नका.

धनू : शुभ रंग : निळा| अंक : ८

जोखमीची कामे टाळा. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. हातचे सोडून पळत्या मागे धाऊ नका.

मकर : शुभ रंग : आकाशी| अंक : ६

आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य देणार आहात.अधिकार वापरण्याच्या योग्य संधी चालून येणार आहेत.

कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ४

घरात काहीतरी कारणाने वडीलधाऱ्यांंशी मतभेद होऊ शकतात. हितशत्रू मित्रांमध्येच लपलेले असतील.

मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५

पैशाअभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील.आत्मविश्वासाने नव्या योजना राबवता येतील. आराेग्य साथ देईल.

बातम्या आणखी आहेत...