आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 29 एप्रिल रोजी अनुराधा नक्षत्रामुळे वरियान नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना लाभाचा दिवस असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जातील. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...

मेष: शुभ रंग : जांभळा| अंक : ८
नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचे आहे. आज जोडीदाराशी सामंजस्याची भावना राहील.

वृषभ: शुभ रंग : मोरपंखी| अंक : ९
आर्थिक स्थिती उत्तम असून मानसिक स्वास्थ्य चांगले असेल. आज संध्याकाळी डॉक्टरांना भेटावे लागेल. लहानसहान दुखणीही अंगावर काढू नका.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता| अंक : ६
नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. कलाकार व खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात येतील. आज तुम्ही मुलांचे लाड पुरवण्याचा प्रयत्न कराल.

कर्क : शुभ रंग : क्रीम| अंक : ७
रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. व्यग्र दिवस.

सिंह :शुभ रंग : गुलाबी|अंक : ५
नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर झाल्याचे जाणवेल.

कन्या : शुभ रंग : डाळिंबी|अंक : १
सगळी महत्त्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा. वैवाहिक जीवनात जोडीदाराची मते विचारात घ्यावीत.

तूळ : शुभ रंग : सोनेरी| अंक : ३
आज कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. तुमचा चैनीकडे कल राहील. वैवाहिक जीवनात तू तिथे मी.

वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी| अंक : २
आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. अनावश्यक खर्चावर लगाम गरजेचा राहील.

धनु : शुभ रंग : मरून|अंक : ४
नेतेमंडळींची लोकप्रियता वाढेल. भावनेच्या भरात कुणाला शब्द दिलेे असतील तर ते पाळावे लागतील.

मकर : शुभ रंग : निळा|अंक : ६
काही अत्यावश्यक खर्च हात जोडून उभे राहणार आहेेत. दुरावलेल्या नात्यांतील गैरसमज दूर होतील.

कुंभ : शुभ रंग : आकाशी|अंक : ९
नोकरीत वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भावना व कर्तव्य यांचा मेळ साधणे कठीण जाईल. दैव साथ देईल.

मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ५
व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील.घरात भांड्याला भांडे लागेल.

बातम्या आणखी आहेत...