आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 3 डिसेंबर 2020 ला शुभ नावाचा खास योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. गुरुवारी आद्रा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ३
व्यवसायातील वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. कायद्यात राहा.

वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ६
चंगळवादी वृत्ती राहील. बऱ्याच दिवसांनी जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन : शुभ रंग : मरून | अंक : १
कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कदाचित चुकण्याची शक्यता आहे.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ८
अति धावपळ टाळा. हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील. आज जोडीदाराने दिलेले सल्लेही मोलाचे असतील.

सिंह : शुभ रंग : निळा| अंक : ९
वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. शेजारी कुत्सित नजरेने बघतील. गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.

कन्या : शुभ रंग : नारिंगी| अंक : ७
व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागेल. काही तत्त्वे गुंडाळून ठेवावी लागतील. डोके शांत ठेवण्याची गरज.

तूळ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ५
आज फक्त कष्ट करीत राहा, फळाची अपेक्षा मात्र उद्याच करा. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील.

वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६
एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज मित्रांकडून प्रोत्साहन मिळेल.

धनू : शुभ रंग : भगवा | अंक : ३
नोकरीच्या ठिकाणी आज कामाव्यतिरिक्त फार खोलात शिरू नका. वरिष्ठ जितके विचारतील तितकेच बोला.

मकर : शुभ रंग : केशरी | अंक : १
समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील. आज आपल्या मतावर ठाम राहता येईल.

कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ४
गोडबोली माणसे भेटतील. नवीनच झालेल्या ओळखीत लगेच विश्वास ठेवू नका. झटपट लाभाचा मोह टाळा.

मीन : शुभ रंग : जांभळा | अंक : २
नोकरीत वरिष्ठांना काही सुचवण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. आपल्या अडचणी देवालाच सांगा.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser