आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रह्मा नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

गुरुवार, 30 जुलै 2020 ला शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. गुरुवारी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग तयार होत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

मेष : शुभ रंग : केशरी | अंक : १
काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. वैवाहिक जीवनात आज संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील.

वृषभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ३
नोकरीच्या ठिकाणी अधिकारी वर्गाची आपल्यावर मर्जी आहेच या भ्रमात राहू नका. सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचे आहे. जोडीदाराच्या भावना समजून घेणे हिताचे.

मिथुन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५
आर्थिक स्थिती उत्तम असून मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल. सहकुटुंब चैन व करमणुकीस प्राधान्य द्याल. संध्याकाळी डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल.

कर्क : शुभ रंग : मरून | अंक : ७
नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. कलाकार व खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात येतील.

सिंह : शुभ रंग : लाल| अंक : ८
आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत.

कन्या : शुभ रंग : हिरवा| अंक : २
विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत.

तूळ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ४
आज काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे असले तरी पुरेसा पैसाही उपलब्ध होणार आहे.

वृश्चिक : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ६
आधुनिक राहणीमानाकडे कलराहील. रागावून निघून गेलेल्या व्यक्ती दुपारनंतर घरी परत येतील.

धनू : शुभ रंग : मोतिया | अंक : ६
आज स्वावलंबन महत्त्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या मित्रांमधे वितुष्ट संभवते.

मकर : शुभ रंग : जांभळा | अंक : ७
बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर झाल्याचे जाणवेल. तुमची कामातील निष्ठा वरिष्ठांना प्रभावित करेल.

कुंभ : शुभ रंग : निळा | अंक : ३
सरकार दरबारी रखडलेली काही कामे दुपारनंतर मार्गी लागतील. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.

मीन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ५
भावना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल. आज घरातील वडीलधाऱ्या मंडळींची मते विचारात घेणे गरजेचे आहे.