आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 31 डिसेंबर रोजी पुनर्वसू नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती ऐंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील....

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...

मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : ६
आज झालेल्या नव्या ओळखी भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळा.

वृषभ : शुभ रंग : हिरवा| अंक : ७
विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय योग्य ठरतील. नवकवींच्या लिखाणास प्रसिद्धी मिळेल. आशादायी दिवस.

मिथुन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ९
अत्यंत उत्साहवर्धक दिवस. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या गुणांची दखल घेतील. वाढीव जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकाल. दूरच्या प्रवासात खोेळंबा होईल.

कर्क : शुभ रंग : मोतिया| अंक : ८
हाती असलेले पैसे जपून वापरा. आनंदाच्या भरात वचने देऊ नका. कारण ती पाळता येणार नाहीत.

सिंह : शुभ रंग : पिस्ता|अंक : ५
आवक पुरेशी असल्याने मनासारखा खर्च करता येईल. मित्र दिलेले शब्द पाळतील. आजचा दिवस लाभाचा.

कन्या : शुभ रंग : क्रिम|अंक : ३
भावना व कर्तव्य यात मनाची ओढाताण होण्याची शक्यता. काही बिकट प्रसंगांना चतुराईने तोंड द्याल.

तूळ : शुभ रंग : शुभ रंग : केशरी| अंक : ४
महत्त्वाचे निर्णय घेताना मात्र द्विधा मन:स्थिती होईल. भक्तिमार्गात असलेल्यांना सद्गुरू कृपेचा लाभ होईल.

वृश्चिक : शुभ रंग : निळा| अंक : २
कार्यक्षेत्रात आज काही मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता आहे. आज क्रोधावर लगाम गरजेचा राहील.

धनु : शुभ रंग : भगवा| अंक : ५
व्यावसायिक करार मदार यशस्वी होतील. कौटुंबिक जीवन समाधानी असून स्वास्थ्य उत्तम राहील.

मकर : शुभ रंग : पांढरा| अंक : १
नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकमणे काम कराल. काही इतरांनी केलेल्या चुकाही निस्तराव्या लागणार आहेत.

कुंभ : शुभ रंग : नारिंगी| अंक : ६
मुलांच्या बाबतीत काही योग्य निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यांच्या शिस्तीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मीन : शुभ रंग : तांबडा| अंक : ४
स्थावर इस्टेटीविषयी रखडलेल्या कामांना चालना मिळेल. मानसिक शांतता लाभेल व आरोग्यही उत्तम राहील. किमती खरेदी कराल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser