आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 4 फेब्रुवारी रोजी स्वाती नक्षत्र असल्यामुळे गंड नावाचा योग जुळून येत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 5 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. गुरूवारच्या या अशुभ योगामुळे 5 राशीचे लोक जास्त तणावात राहतील. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...

मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : ३
कामाच्या व्यापात स्वत:च्या आवडीनिवडी दुर्लक्षित होतील. रिकामटेकड्या गप्पांतून फक्त वाद होतील.

वृषभ : शुभ रंग : पांढरा| अंक : १
आज तुम्हाला काही मानापमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. काही येणी असल्यास वसूल होऊ शकतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश.
रुग्णांनी पथ्य पाळणे गरजेचे.

मिथुन : शुभ रंग : मरून| अंक : ४
कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज स्वत:च्या आवडीनिवडीस प्राधान्य द्याल.

कर्क : शुभ रंग : गुलाबी| अंक : ५
वास्तू व वाहन खरेदीच्या कामातील अडथळे दूर होतील. कलेच्या क्षेत्रात स्ट्रगल वाढवावी लागेल.

सिंह : शुभ रंग : लाल|अंक : २
कामाच्या व्यापात कुटुंबीयांना वेळ देणे अशक्य होईल. प्रॉपर्टी-खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळलेलेच बरे.

कन्या : शुभ रंग : केशरी|अंक : ७
आर्थिक बाजू भक्कम राहील. मोठी खरेदी कराल. महत्त्वाच्या चर्चेत आपली बाजू प्रभावीपणे मांडाल.

तूळ : शुभ रंग : निळा| अंक : ९
उत्साहाच्या भरात चुकीचे निर्णय घ्याल. असलेला पैसा जपून वापरा. कुणाला शब्द देऊ नका.

वृश्चिक : शुभ रंग : जांभळा| अंक : ८
काम सोडून काही निरर्थक वादविवादात वेळ खर्च होण्याची शक्यता आहे. प्रवासात झोपून चालणार नाही.

धनू : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ६
दुरावलेले नातलग एकत्र येतील. मित्र अश्वासने पूर्ण करतील. नव्या योजना वेग घेतील. स्वप्नपूर्तीचा दिवस.

मकर : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
भावना व कर्तव्य याचा समन्वय साधावा लागेल. कामाच्या ठिकाणी हितशत्रू तुमच्या चुका शोधतील.

कुंभ : शुभ रंग : भगवा| अंक : ३
अधिकारी वर्गास हाताखालच्या लोकांची नाराजी पत्करावी लागेल. शासकीय कामे रखडणार आहेत.

मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ७
भिडस्तपणाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. अति कष्ट तब्येत बिघडण्यास कारणीभूत होतील. विश्रांती गरजेची.

बातम्या आणखी आहेत...