आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

गुरुवार 6 ऑगस्ट 2020 रोजी अतिगंड नावाचा अशुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 मधील 6 राशीच्या लोकांनी सांभाळून राहणे योग्य ठरेल. या राशीच्या लोकांना धनहानी होऊ शकते. व्यर्थ धावपळ आणि तणावाची स्थिती राहील. खर्च वाढेल तसेच हे लोक चुकीच्या निर्णयामुळे अडचणीत येऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांवर अशुभ योगाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

मेष: शुभ रंग : पिस्ता | अंक : ९
योग्यवेळी घेतलेल्या निर्णयांचे चीज होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. मित्रमंडळींत माेठेपणा मिळेल.

वृषभ: शुभ रंग : तांबडा | अंक : ८
अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. आज नाकासमोर चालणेच हिताचे राहील. बेकायदेशीर कृत्ये अंगाशी येऊ शकतात. मित्रांच्या फार नादी लागूच नका.

मिथुन : शुभ रंग : पांढरा| अंक : ९
कार्यक्षेत्रात आज महत्वपूर्ण निर्णय घेताना अनुभवी मंडळींचा सल्ला घेणे गरजेचे राहील. आज तुम्हाला वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येण्याची शक्यता आहे.
कर्क : शुभ रंग : हिरवा| अंक : १
भागिदारी व्यवसायात काही तीव्र स्वरूपाचे मतभेद होतील. देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा.

सिंह : शुभ रंग : राखाडी|अंक : ८
विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. चांगली वैचारीक देवाणघेवाण होईल. आज तुमचे विचार प्रगल्भ होतील.

कन्या : शुभ रंग : केशरी|अंक : ७
आज तुम्ही सकारात्मक दृष्टीकोन बाळगून नि:स्वार्थीपणे काही कामे कराल. आजच्या कष्टांचे फळ उद्या नक्की.

तूळ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ६
कामावर दांडी मारून थोडं करमणूकीस प्राधन्य द्यावेसे वाटेल. प्रेमप्रकरणांना आज ग्रीन सिग्नल आहे.

वृश्चिक : शुभ रंग : लाल | अंक : २
कुटुंबियांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी कराल. एखाद्या घरगुती समारंभात हजेरी लावाल.

धनू : शुभ रंग : जांभळा | अंक : ५
आज तुम्हाला एखादी गुप्त बातमी समजेल. गृहीणींनी आज झाकाली मूठ झकालीच ठेवणे गरजेचे आहे.

मकर : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १
राशीच्या धनस्थानातून होणारे चंद्रभ्रमण अनपेक्षित पैसा मिळवून देईल. तुमची भाग्योदयाकडे वाटचाल होईल.

कुंभ : शुभ रंग : राखाडी | अंक : ४
आज हातचे सोडून पळत्यामागे धावण्याचा मोह होईल. कार्यक्षेत्रात विरोधकांना कमजोर समजून चालणार नाही.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३
पैसा येण्याइतकेच जाण्याचेही मार्ग प्रशस्त असतील. चैनी वृत्तीस थोडा लगाम घालणे गरजेचे आहे. आज प्रतिष्ठेस जपावे.

बातम्या आणखी आहेत...