आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुरुवार 6 जानेवारी रोजी शतभिषा नक्षत्र असल्यामुळे सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते. सेव्हिंगही वाढेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...
मेष : शुभ रंग : हिरवा| अंक : २
कार्यक्षेत्रात मानसन्मान वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. मित्रांना तुमचा हेवा वाटेल. उत्तम दिवस.
वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ५
आत्मविश्वास व मनोबलात वृध्दी होईल. महत्वाचे व्यावसायिक करार आज दुपारनंतर कलेले बरे.
मिथुन : शुभ रंग : क्रिम| अंक : ४
महत्वाची सर्व कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी. नोकरदारांनी बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे.
कर्क : शुभ रंग : केशरी| अंक : ३
घाईगर्दीत घेतलेले निर्णय चुकण्याचीच शक्यता आहे. ज्यात काही कळत नाही त्यात उगीच डोकाऊ नका.
सिंह : शुभ रंग : निळा | अंक : ८
तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही पैशाची आवकही पुरेशी राहील.
कन्या : शुभ रंग : आकाशी | अंक : १
नोकरीत कामाचा ताण वाढेल. तरूणांना घरात थोरांच्या शब्दास मान द्यावा लागेल. गृहीणी व्यस्त.
तूळ : शुभ रंग : पांढरा| अंक : ९
पारिवारिक समस्या सहज सुटल्याने आनंदी व उत्साही असाल. कलाकारांना प्रसिध्दी मिळेल.
वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
राहत्या जागेचे प्रश्न सुटतील. सकाळी वजनदार असलेले खिसे आज संध्याकाळी रिकामे होतील.
धनु : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
कुठलीही गोष्ट सहज शक्य नाही. तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांस यश मिळेल. भटकंती होईल.
मकर : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
कष्टांच्या प्रमाणात मोबदलाही पुरेपुर राहील.आज प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. छान दिवस.
कुंभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ५
आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. अडचणीच्या प्रसंगी मित्र धाऊन येतील.
मीन : शुभ रंग : मरून| अंक : ८
कष्टांच्या प्रमाणात मोबदलाही पुरेपुर राहील.आज प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. छान दिवस.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.