आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुरुवार 6 मे रोजी शतभिषा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजचे ग्रह-तारे इंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहेत. या शुभ योगाच्या प्रभावामुळे बहुतांश लोकांसाठी दिवस चांगला राहील. ग्रहांच्या प्रभावामुळे अडचणी नष्ट होतील. समस्येतून मार्ग सापडेल. ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या शुभ योगांचा फायदा विशेषतः 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. याव्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...
मेष: शुभ रंग : भगवा | अंक : १
कार्यक्षेत्रात नवी आव्हाने सकारात्मकतेने स्वीकाराल.आपले काम सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी गौण असतील. कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागू शकते.
वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ९
आज लाभाचा दिवस असून उत्पन्नाचे विवध मार्ग दिसून येतील. पूर्वीच्या कष्टांचे फळ दृष्टिक्षेपात येईल. दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येणार आहेत.
मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : २
आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. वैवाहिक जीवनात किरकोळ वाद संभवतात, पण फार ताणून धरू नका. सासुरवाडीकडून लाभ संभवतो.
कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : ६
उद्योगधंद्यातील करार मदार दुपारपूर्वीच उरकून घ्या. संध्याकाळी वाहन चालवताना सतर्क रहा. वैवाहीक जिवनांत आज दुपारनंतर मौन सर्वार्थ साधनम.
सिंह : शुभ रंग : आकाशी | अंक : ४
हट्टीपणा सोडून संयमाने वागण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रात स्पर्धकांवर सहजपणे मात करू शकाल. जोडीदाराच्या चुका काढायची चूक करू नका.
कन्या : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३
व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. तुमचा कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील.आज जोडीदारास दिलेले शब्द पाळणे हिताचे राहील.
तूळ : शुभ रंग : अबोली | अंक : १
जागेसंबंधित महत्त्वाचे व्यवहार मार्गी लागतील.वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन यामुळे यशाचा मार्ग सोपा होईल. गृहसैख्य लाभेल.
वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : ६
पतप्रतिष्ठा वाढेल. आज आप्तस्वकीयात तुमच्या शब्दास मान राहील. जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. हितशत्रू पळवाट शोधतील. आजचा दिवस यशदायी.
धनू : शुभ रंग : सोनेरी | अंक : ५
आज संमिश्र फळे देणारा दिवस असून आवक -जावक समान राहील. शब्द जपून वापरल्यास वाद टाळता येतील. थोरामोठ्यांंच्या वयाचा मान राखा.
मकर : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८
नवीन झालेले परिचय फायदेशीर ठरतील. आज तुम्हाला परिवारासाठी वेळ देणे कठीण जाईल. सामाजिक कामे करणाऱ्यांना लोकांचा आदर मिळेल.
कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : ७
काही जणांना प्रवासास निघावे लागेल. गृहिणींना क्षणभरही उसंत मिळणे कठीण अाहे. जमाखर्चाचा मेळ बसवणे अवघड जाईल. व्यग्र दिवस.
मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : ९
आज स्वत:ची. हौसमौज पुरवण्यासाठी सढळ हस्ते पैसे खर्च कराल. जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवाल. कोणत्याही स्पर्धेत आज अंतिम विजय तुमचाच राहील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.