आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 7 एप्रिल रोजी मृगशीर्ष नक्षत्रामुळे सौभाग्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची साथ मिळेल. या राशीच्या लोकांच्या जुन्या अडचणी दूर होऊ शकतात. नवीन लोकांसोबत ओळख होण्याचे योग आहेत. नवीन गुंतवणूक आणि फायदेशीर सौदे होऊ शकतात. नोकरी करणा-या लोकांना अधिका-यांची मदत मिळू शकते. नियोजित आणि खास काम करायची असतील तर गुरुवार शुभ आहे. यासोबतच इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...

मेष : शुभ रंग : हिरवा | अंक : ६
ज्येष्ठ मंडळी सहलीचेे बेत आखतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत. यश तितकेसे सोपे नाही.

वृषभ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८
व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळून स्वत:चे वेगळे स्थान निर्माण कराल. गरजूंस मदत कराल.

मिथुन : शुभ रंग : आकाशी | अंक : ३
आज तुमचा स्वत:चेच खरे करण्याकडे कल राहील. त्यामुळे काही आपलीच माणसे दुखावली जातील.

कर्क : शुभ रंग : जांभळा| अंक : ९
आज काही दूरचे नातलग संपर्कात येणार आहेत. आज स्वत:चा मोठेपणा जपण्यासाठी खर्च कराल.

सिंह : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ६
यशस्वी व्यक्तींच्या सहवासात महत्वाकांक्षा वाढतील. आप्तस्वकीय, मित्रमंडळींत शब्दास मान राहील.

कन्या : शुभ रंग : क्रिम | अंक : ७
नोकरीत काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करील. ध्येय साध्य होतील.

तूळ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ५
कार्यक्षेत्रात बिकट प्रसंग यशस्वीरीत्या हताळाल. प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची साथ मिळेल.

वृश्चिक : शुभ रंग : भगवा| अंक : ३
आज काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कुणाकडून सहकार्याची अपेक्षा करू नका.

धनु : शुभ रंग : गुलाबी| अंक : १
आज धंद्यातील आवक जावक सेम सेमच राहील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत.

मकर : शुभ रंग : गुलाबी| अंक : ४
खाण्या पिण्यावर नियंत्रण असणे गरजेचे राहील. आज काही आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.

कुंभ : शुभ रंग : हिरवा| अंक : २
पारिवारीक सुखात वृध्दीच होईल. वाहन वास्तुविषयी खरेदी विक्री फायद्यातच राहील. मुलांना शिस्त लावा.

मीन : शुभ रंग : मरून | अंक : ८
कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रीत करावे लागेल. आज गृहीणींना गृहोद्योगांतून चांगली कमाई होईल.

बातम्या आणखी आहेत...