आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 7 जानेवारी रोजी चित्रा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती सुकर्मा नावाचा शुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...

मेष : शुभ रंग : क्रीम| अंक : ४
रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी आहे. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे.

वृषभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ५
घरात अधुनिक सुखसुविधांसाठी खर्च कराल. नव्या नोकरीच्या शोधात असाल तर अनेक संधी चालून येतील. गूढशास्त्रच्या अभ्यासकांना प्रचिती येईल.

मिथुन : शुभ रंग : राखाडी| अंक : ३
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस असून कुटुंबीयांस पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

कर्क : शुभ रंग : मोतिया| अंक : १
दैनंदिन कामातही काही अडथळ्यांचे डोंगर उभे असतील. मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल.

सिंह : शुभ रंग : हिरवा|अंक : ७
आज रिकाम्या गप्पा टाळा कारण त्यातूनच गैरसमज पसरतील. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका.

कन्या : शुभ रंग : लाल|अंक : २
व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना यशस्वीपणे कराल. आज जोडीदाराची साथ मोलाची राहील.

तूळ : शुभ रंग : चंदेरी| अंक : ६
आज काही देणी चुकवावी लागणार आहेत. हौसमौज करण्यावर थोडी मर्यादा येईल. डोळ्यांची निगा राखा.

वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी| अंक : ८
वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मोठ्या लोकांच्या ओळखीने हित साधाल. संततीकडून सुवार्ता.

धनु : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ५
नोकरदारांना ओव्हर टाइम करावा लागणार आहे.रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही.

मकर : शुभ रंग : भगवा| अंक : ९
शासकीय कामे रखडणार आहेत. गृहिणींचा अाज देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेल.

कुंभ : शुभ रंग : भगवा| अंक : ९
कार्यक्षेत्रात झटपट लाभाचा मोह टाळा. गाेडबोल्या मंडळींपासून दोन हात दूरच राहा. आज रिस्क नकोच.

मीन : शुभ रंग : जांभळा| अंक : ६
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध जुळून येतील. ध्येयाचा पाठलाग करताना प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. आज पत्नीचे सल्ले डावलू नका.

बातम्या आणखी आहेत...