आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • गुरुवार 7 मार्च रोजी स्वाती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आज वैशाख पौर्णिमा आहे

गुरुवार 7 मार्च रोजी स्वाती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आज वैशाख पौर्णिमा आहे. आजच्या दिवशी बुद्ध पौर्णिमाही साजरी केली जाते. आजच्या ग्रह-स्थितीमुळे व्यतिपात नावाचा एक अशुभ योगही जुळून येत आहे.  अशुभ ग्रह-नक्षत्रांमुळे देवाण-घेवाण आणि गुंतवणूकीत धनहानी होण्याची शक्यता राहील. काही लोक वादात अडकतील. इतर शुभ ग्रहांच्या प्रभावामुळे काही राशींना नुकसान होणार नाही. 

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

  • मेष: शुभ रंग : आकाशी | अंक : २

व्यवसायात भागिदारांशी सलोख्याचे संबंध राहतील.जोडीदाराशी सामंजस्य राहील. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील. प्रवास कंटाळवाणे होणार आहेत.

  • वृषभ: शुभ रंग : नारिंगी | अंक : ६

दैनंदीन कामातही अडथळे येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. सत्संगाने मानसिक बळ मिळेल.

  • मिथुन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९

तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठीतांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. मित्रांच्या मदतीस धाऊन जाणार आहात.

  • कर्क : शुभ रंग : राखाडी | अंक : ७

कौटुंबिक स्तरावर आज काही मनासारख्या घटना घडणार आहेत. मुले अज्ञाधारकपणे वागतील. प्रेमवीरांनी मात्र आज तू नही तो और सही हेच धोरण ठेवावे.

  • सिंह : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३

आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.

  • कन्या : शुभ रंग : निळा | अंक : १

नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. विरोधकांचा जोर आता कमी होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल.

  • तूळ : शुभ रंग : लाल | अंक : ४

शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.

  • वृश्चिक : शुभ रंग : निळा| अंक : ३

उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ  आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. नोकरदारांना साहेबांच्या लहरी सांभाळाव्या लागतील. पत्नीच्याही लहरी सांभाळाल.

  • धनू : शुभ रंग : पांढरा | अंक : ४

तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. दुपारनंतर एखादी चांगली बातमी येईल. आज तुमचा ईच्छापूर्तीचा दिवस.

  • मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८

आज महत्वाची कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी.थोडी मानसिक अस्वस्थता राहील. नोकरीत वरीष्ठांचे दडपण जाणवेल. कर्तव्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे.

  • कुंभ : शुभ रंग : केशरी | अंक : ५

कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. प्रवासात काही नवे हितसंबंध निर्माण होतील. गृहीणींना थोरांचे मानपान सांभाळावे लागतील.

  • मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : २

आपले म्हणणे इतरांना पटावेच असा अट्टहास आज करून चालणार नाही. कुणालाही मोफत सल्लेवाटप करू नका. आज फक्त आपल्या ताटात बघुन जेवा.

बातम्या आणखी आहेत...