आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

3 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
 • कॉपी लिंक
 • हर्षण नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

गुरुवार 9 एप्रिल रोजी स्वाती नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

 • मेष: शुभ रंग : हिरवा | अंक : २

समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील. आज सभासंमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.

 • वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : ७

आज फक्त कष्ट करीत रहा, फळाची अपेक्षा मात्र उद्याच करा. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. नोकरीत वरीष्ठांचे समाधान अशक्य. 

 • मिथुन : शुभ रंग : नारिंगी | अंक : ९

आज कर्तव्या पेक्षा मौजमजेस प्राधान्य द्याल.चंगळवादी वृत्ती राहील. बऱ्याच दिवसांनी कही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. आरोग्य उत्तम राहील.

 • कर्क : शुभ रंग :जांभळा| अंक : ८

कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. आज तुमचे मनोबल वाढवणाऱ्या कही घटना घडतील. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कदाचित चुकण्याची शक्यता आहे.

 • सिंह : शुभ रंग : पिवळा | अंक : ६

व्यवसायात जाहीरातबाजी वाढवावी लागेल. काही तत्व गुंडाळून ठेवावी लागतील. आज काही अती हुषार मंडळी संपर्कात येतील. डोके शांत ठेवण्याची गरज. 

 • कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३

आज रिकाम्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य देऊनच कार्यक्षेत्रातील वर्चस्व टिकवून ठेवता येईल. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. शेजारी कुत्सित नजरेने बघतील.

 • तूळ : शुभ रंग : केशरी | अंक : ४

अती धावपळ टाळा. हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील. आज जोडीदाराने दिलेले सल्लेही मोलाचे असतील.

 • वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : २

व्यवसायातील वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. कायद्यात रहा. 

 • धनू : शुभ रंग : तांबडा | अंक : ५

स्थावरासंबंधीत अपूरे व्यवहार मार्गी लागतील. वास्तू व वाहन खरेदीसठी कर्जमंजूरी होईल. विद्यार्थ्यांकडून कौतुकास्पद कामगिरी होईल. अाज म्हणाल ती पूर्व.   

 • मकर : शुभ रंग : क्रिम | अंक : १

एखाद्या नव्या उपक्रमाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवासायिक नवे करार यशस्वी होतील. यश हाकेच्या अंतरावर आल्याचे जाणवेल.

 • कुंभ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ५

नोकरीच्या ठीकाणी  आपल्या कामाव्यतिरीक्त फार खोलात शिरू नका. वरीष्ठांना काही सुचवण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. अडचणी  देवालाच सांगा. 

 • मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : ३

नवीन ओळखीत लगेच विश्वास ठेऊ नका. काही गोडबोली माणसे भेटतील. झटपट लाभाचा मोह टाळणेच हिताचे राहील. आज कामापुरतेच बोला.  

बातम्या आणखी आहेत...