आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 9 डिसेंबर रोजी धनिष्ठा नक्षत्र असल्यामुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. या 6 राशीच्या लोकांना दिवस धावपळीचा आणि धनहानीचा राहू शकतो. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : सोनेरी| अंक : ८
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. वरीष्ठांची मर्जी सांभाळाल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल.

वृषभ : शुभ रंग : आकाशी| अंक : ७
मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. सत्संगाने मानसिक बळ मिळेल. अारोग्यास जपा.

मिथुन : शुभ रंग : चंदेरी| अंक : ९
क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.

कर्क : शुभ रंग : जांभळा | अंक : ५
उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. पत्नीचे मूड सांभाळावे लागतील.

सिंह : शुभ रंग : केशरी| अंक : ६
आपले म्हणणे इतरांना पटावेच असा अट्टहास करून चालणार नाही. आज विरोधकांशी सामंजस्याने घ्यावे.

कन्या : शुभ रंग : सोनेरी| अंक : ३
तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठीतांचे सहवास लाभदायक ठरतील.

तूळ : शुभ रंग : मोरपीशी| अंक : ४
लहान मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. कौटुंबिक वाद असतील तर सुसंवादाने मिटू शकतील.

वृश्चिक : शुभ रंग : पांढरा| अंक : २
प्रवासात नवे हितसंबंध निर्माण होतील. घरचे सोडून लष्कराच्या भाकऱ्या भाजाल. गरजूस मदत कराल.

धनु : शुभ रंग : मोतिया| अंक : १
आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील.

मकर : शुभ रंग : जांभळा| अंक : १
तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. अत्यंत अनुकूल दिवस.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
महत्वाची कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी.थोडी मानसिक अस्वस्थता राहील. महत्वाची मेल्स येतील.

मीन : शुभ रंग : लाल| अंक : ६
विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. लघु उद्योजकांचे कर्जप्रस्ताव मंजूर होतील. स्वप्नपूर्तीचा दिवस.

बातम्या आणखी आहेत...