आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य :जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा रविवार

3 महिन्यांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • ज्येष्ठा नक्षत्रामध्ये होत आहे सुरुवात, असा राहील आजचा दिवस

रविवार, 12 एप्रिल रोजी दिवसाची सुरुवात ज्येष्ठा नक्षत्रामध्ये होत आहे. ग्रह आणि नक्षत्र स्थितीमुळे आजच्या दिवशी वरियान नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी दिवस विशेष फळ देणारा तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी संमिश्र स्वरुपाचा ठरू शकतो.


मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : ३

नोकरदार मंडळी वरीष्ठांचे मूड सांभाळतील. अधिकारी वर्गास कामगारांच्या प्रश्नांत लक्ष घालावे लागणार आहे. ज्येष्ठांना आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.


वृषभ : शुभ रंग : क्रिम | अंक : २

हौशी मंडळींना आज जिवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. ज्येष्ठांना उत्तम प्रकृती स्वास्थ लाभेल.


मिथुन : शुभ रंग : मोरपिशी | अंक : १

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. गृहीणी जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पाडतील.


कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ५

आज घराबाहेर रागिट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अती स्पष्ट बोलण्याने इतरांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. काही गुपिते उघड होतील.


सिंह : शुभ रंग : हिरवा | अंक : ४

पैशाची कमतरता जाणवणार नाही. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचाही प्रभाव पडेल. भावंडांमधे मात्र क्षुल्लक कारणाने कटुता येण्याची शक्यता आहे.


कन्या : शुभ रंग :आकाशी| अंक : ७

अथक परिश्रमांच्या सहाय्याने प्रगतीची चक्रे गतीमान ठेवता येतील. योग्य माणसे संपर्कात येतील. काही महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार आहे.


तूळ : शुभ रंग : निळा | अंक : ६

आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल. दानधर्म करताना स्वत:ची शिल्लक बघायला हवी.


वृश्चिक : शुभ रंग : केशरी | अंक : ९

कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. मोठया लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. उपवरांंना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. इच्छापूर्तीचा दिवस.


धनू : शुभ रंग : सोनेरी | अंक : १

व्यवसायात उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. उत्पादनांचा दर्जा वाढवावा लागेल. प्रामाणिक प्रयत्नांस यश निश्चित.


मकर : शुभ रंग : भगवा | अंक : ८

आज तुम्ही फक्त स्वत:चा विचार करा. न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणेच हिताचे राहील. वादविवादात फक्त ऐकण्याचे काम करा. मोफत सल्लेवाटप नको.


कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : ६

हौसमौज करताना मर्यादांचे उल्लंघन करू नका. चूकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची हानी होऊ शकेल. आज वैवाहीक जिवनांत जोडीदाराकडून फार अपेक्षा नकोत.


मीन : शुभ रंग : राखाडी | अंक : ३

वैवाहीक जिवनांत असलेले किरकोळ मतभेद आज सामंजस्याने मिटू शकणार आहेत. व्यवसायाच्या ठीकाणी भागिदारांशी सलोखा राहील. आनंदी दिवस.

0