आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य :जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस

3 महिन्यांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • सिद्ध योगमध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, असा राहील आजचा दिवस

बुधवार, 15 एप्रिल रोजी दिवसाची सुरुवात उत्तराषाढा नक्षत्रामध्ये होत आहे. आज ग्रह आणि नक्षत्रांच्या परिस्थितीतून सिद्ध नावाचा एक योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 5 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी काहीसा चढ-उतारांचा ठरू शकतो.

मेष : शुभ रंग : भगवा | अंक : १

अती धावपळ टाळा. हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील. आज जोडीदाराने दिलेले सल्लेही मोलाचे असतील.


वृषभ : शुभ रंग : राखाडी | अंक : ७

अधुनिक राहणीमानाकडे तुमचा कल असेल. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. उच्चशिक्षणार्थींच्या अपेक्षा वाढतील. नवीन विषयात गोडी निर्माण होईल.


मिथुन : शुभ रंग : सोनेरी | अंक : २

आज पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. आपल्या अधिकारांचा दूरुपयोग टाळावा. व्यवसायात स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी हवी.


कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : १

व्यवसायातील वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. कायद्यात राहा.


सिंह : शुभ रंग : क्रिम | अंक : ४

एखाद्या नव्या उपक्रमाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवासायिक नवे करार यशस्वी होतील. यश हाकेच्या अंतरावर आल्याचे जाणवेल.


कन्या : शुभ रंग : चंदेरी | अंक : ८

नोकरीच्या ठिकाणी फक्त बिनचूक काम करण्यावर भर द्या. वरीष्ठांना काही सुचवण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. अध्यात्मिक मार्गाकडे पावले वळतील.


तूळ : शुभ रंग : मोतिया | अंक : ३

नवीनच झालेल्या ओळखीत लगेच विश्वास ठेऊ नका. काही गोडबोली माणसे भेटतील. झटपट लाभाचा मोह टाळणेच हिताचे. कामापुरतेच बोला.


वृश्चिक : शुभ रंग : जांभळा | अंक : ३

आज फक्त कष्ट करीत रहा, फळाची अपेक्षा मात्र उद्याच करा. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. नोकरीत वरीष्ठांचे समाधान अशक्य.


धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९

समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील. आज सभासंमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.


मकर : शुभ रंग : निळा | अंक : ६

कर्तव्यापेक्षा मौजमजेस प्राधान्य द्याल. चंगळवादी वृत्ती राहील. आज तुम्ही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. संध्याकाळी डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल.


कुंभ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९

स्थावरासंबंधीत अपूरे व्यवहार मार्गी लागतील. वास्तू व वाहन खरेदीसठी कर्जमंजूरी होईल. विद्यार्थ्यांकडून कौतुकास्पद कामगिरी होईल. आज म्हणाल ती पूर्व.


मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ५

व्यवसायात जाहीरातबाजी वाढवावी लागेल. काही तत्व गुंडाळून ठेवावी लागतील. आज काही अती हुषार मंडळी संपर्कात येतील. डोके शांत ठेवण्याची गरज.

0