आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळावर 1 सप्टेंबर रोजी धनिष्ठा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे अतिगंड नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा राहील. या लोकांनी नोकरी आणि बिझनेसच्या ठिकाणी सावध राहावे. अशुभ योगाच्या प्रभावाने नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

मेष: शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५
आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील.

वृषभ: शुभ रंग : जांभळा | अंक : २
आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल.नोकरीत काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करील. ध्येय साध्य होतील.

मिथुन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ३
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची हमखास साथ मिळणार अहे. अध्यात्मिक मार्गात असाल तर उपासनेचे फळ मिळेल.

कर्क : शुभ रंग : मोतिया | अंक : १
आज काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा नको.

सिंह :शुभ रंग : भगवा|अंक : ४
जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहीणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदीत होतील.

कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ७
काही आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे. रूग्णांनी पथ्य पाळावे.

तूळ : शुभ रंग : आकाशी|अंक : ६
वाहन वास्तुविषयी खरेदी विक्री चे व्यवहार फायद्यातच राहतील. तरूण मंडळी आज बेफिकीरपणे वागतील.

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी|अंक : ९
आज तुम्ही कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रीत कराल. गृहीणींना गृहोद्योगांतून चांगली कमाई होणार आहे.

धनु : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८
ज्येष्ठ मंडळी तिर्थाटनाचे बेत आखतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत. यश तितकेसे सोपे नाही.

मकर : शुभ रंग : चंदेरी | अंक : ४
व्यवसायात उत्तम यश मिळून स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण होईल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.

कुंभ : शुभ रंग : तांबडा | अंक : ३
आज तुम्ही काहीसे हट्टीपणाने वागाल. स्वत:चेच खरे कराल. घाईगर्दीत काही चुकीचे निर्णय घेतले जातील.

मीन : शुभ रंग : नारिंगी | अंक : ७
काही दूरचे नातलग संपर्कात येतील. आपल्या अती स्पष्ट बोलण्याने कुणाची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.