आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 10 ऑगस्टचे ग्रह-तारे मेषपासून मीनपर्यंत 6 राशींसाठी अडचणीचे ठरू शकतात. मघा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून परीघ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते. कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...

मेष : शुभ रंग : मोतिया| अंक : ३
उच्चशिक्षित तरुणांच्या अपेक्षा वाढतील. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. कलाकारांना ग्लॅमर मिळेल.

वृषभ : शुभ रंग : भगवा| अंक : १
कौटुंबिक जीवन समाधानी असेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागतील. आज प्रेमप्रकरणे मनस्तापच देतील.

मिथुन : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
आज भावंडांमधे सामंजस्य राहील. गृहिणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत. बेरोजगारांना रोजगार मिळेल.

कर्क : शुभ रंग : पिस्ता|अंक : २
कार्यक्षेत्रातील पूर्वी केलेल्या श्रमांचे चीज होईल. यश हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल.

सिंह : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस आहे.

कन्या : शुभ रंग : क्रिम| अंक : ५
पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. अधिकारांचा गैरवापर टाळावा. घराबाहेर क्रोधावर लगाम हवा.

तूळ : शुभ रंग : सोनेरी| अंक : ९
कौटुंबिक सदस्यांमधे सामंजस्य राहील. विवाह विषयी बोलणी करायची असतील आज दिवस योग्य.
वृश्चिक : शुभ रंग : डाळींबी| अंक : ७
आज नोकरीच्या ठिकाणी वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत. भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्याल.

धनू : शुभ रंग : सोनेरी| अंक : ८
आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्त्वापूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने घ्या.

मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : ४
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेवू नका. ताकही फुंकून प्यावे.

कुंभ : शुभ रंग : मारपंखी| अंक : ९
दुकानातील गल्ल्यात लक्षणीय वाढ होईल. नोकरदार वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. छान दिवस.

मीन : शुभ रंग : जांभळा| अंक : ८
काही जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे. विरोधकांशी गोड बोलून स्वार्थ साधा.

बातम्या आणखी आहेत...