आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 10 मे रोजी मघा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजच्या ग्रह-स्थितीनुसार ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : भगवा | अंक : ४
स्थावर इस्टेटी विषयी रखडलेली कामे गती घेतील. नव्या ओळखी होतील. मौल्यवान खरेदी कराल.

वृषभ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ३
महत्वाची कामे विलंबाने होतील. मुलांचे वाढते हट्ट पुरवावे लागतील. भावनेच्या भरात वचने देऊ नका.

मिथुन : शुभ रंग : क्रिम| अंक : ५
नव्या ओळखीतून व्यवसायवृध्दी होईल. महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या करताना मात्र आज सावध रहा.

कर्क : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय अचूक ठरतील. छान दिवस.

सिंह : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
नोकरीच्या ठीकाणी वढीव जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकाल. दूरच्या प्रवासात खोेळंबा होईल. संयम ठेवा.

कन्या : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ३
मित्र दिलेले शब्द पाळतील. काही कारणाने दूरावलेले नातलग जवळ येतील. असलेले पैसे जपून वापरा.

तूळ : शुभ रंग : पिस्ता| अंक : १
आज भावना व कर्तव्य यात मनाची ओढाताण होईल. काही अटीतटीच्या प्रसंगांना चतुराईने तोंड द्यावे लागेल.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ९
उच्चशिक्षितांना विदेश गमनाचे वेध लागतील. महत्वाचे निर्णय घेताना आज काहीशी द्विधा मनस्थिती होणार आहे.

धनु : शुभ रंग : हिरवा | अंक : ६
कार्यक्षेत्रात काही मनाविरूध्द घटना घडू शकतील. अशावेळी मानसिक संतूलन ढळू न देणे गरजेचे आहे.

मकर : शुभ रंग : सोनेरी| अंक : ७
व्यावसायात महत्वाचे करार मदार यशस्वी होतील. वादविवादात आपल्याच मतावर ठाम राहू शकाल.

कुंभ : शुभ रंग : जांभळा| अंक : २
आज नोकरीच्या ठीकाणी प्रामाणिकमणे काम कराल.एखादा महत्वाचा निर्णय चुकण्याची शक्यता आहे.

मीन : शुभ रंग : मरून | अंक : १
ज्येष्ठ मंडळींनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. काही उष्णतेचे विकार हैराण करतील.

बातम्या आणखी आहेत...