आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 10 नोव्हेंबर रोजी मघा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजचे ग्रह-तारे इंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहेत. या शुभ योगाच्या प्रभावामुळे बहुतांश लोकांसाठी दिवस चांगला राहील. ग्रहांच्या प्रभावामुळे अडचणी नष्ट होतील. समस्येतून मार्ग सापडेल. ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या शुभ योगांचा फायदा विशेषतः 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. याव्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...

मेष : शुभ रंग : पिस्ता| अंक : २
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी चालून येतील.

वृषभ : शुभ रंग : मरून| अंक : १
आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत.

मिथुन : शुभ रंग : राखाडी| अंक : ३
रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज तुमचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेरच जाणार आहे.

कर्क : शुभ रंग : पांढरा| अंक : ६
आर्थिक स्थिती उत्तम असून मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल. प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल.

सिंह : शुभ रंग : हिरवा| अंक : ४
भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. नेतेमंडळींची समाजात लोकप्रियता वाढेल.

कन्या : शुभ रंग : भगवा| अंक : ५
काही अति आवश्यक खर्च हात जोडून उभे राहणार आहेेत. दुरावलेल्या नात्यांतील गैरसमज दूर होतील.

तूळ : शुभ रंग : नारिंगी|अंक : ९
नोकरीत कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल.बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील.

वृश्चिक : शुभ रंग : केशरी|अंक : ७
नोकरीत वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भवना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे आज कठीणच जाईल.

धनू : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ४
व्यावसायिक चढउतारांचा सामना करावा लागेल. मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. संयम ठेवा.

मकर : शुभ रंग : आकाशी| अंक : ८
वैवाहिक जीवनात संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील. आज कुणाशीही मोठे आर्थिक व्यवहार सतर्कतेने करा.

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ३
तुम्ही स्वत:चे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. तरुणांना घरातील थोरांचे विचार पटणार नाहीत.

मीन : शुभ रंग : गुलाबी|अंक : १
आज स्वावलंबन महत्त्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या मित्रांमध्ये वितुष्ट संभवते.सगळी महत्त्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा.