आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळवार 11 जानेवारीला अश्विनी नक्षत्र असल्यामुळे सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या आठ राशीचे लोक नोकरी आणि बिझनेसमध्ये भाग्यशाली राहतील. मंगळवारचे ग्रह-तारे या राशीच्या फेव्हरमध्ये राहतील. या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...
मेष : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवीआव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल.आज स्पर्धा जिंकाल.
वृषभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ४
हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घ्यायची तुमची तयारी नसेल. आज अधिकारांचा गैरवापर करू नका.
मिथुन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८
पूर्वीच्या एखाद्या गुंतवणूकीतून लाभ मिळेल. नवे हितसंबंध जुळतील. जसे चिंताल तसेच होईल.
कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६
आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका.
सिंह : शुभ रंग : क्रिम| अंक : ९
नोकरीच्या ठीकाणी पदोन्नती होईल. तुमच्या अधिकारात वाढ होईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे हिताचे.
कन्या : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची उत्तम साथ मिळेल. ज्येष्ठ मंडळींना उपासनेचे फळ मिळेल.
तूळ : शुभ रंग : चंदेरी| अंक : ३
काही आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.खाण्यापिण्यावर ताबा गरजेचा. चुकीची संगत टाळावी.
वृश्चिक : शुभ रंग : निळा| अंक : ४
नोकरीत काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करील. ध्येय साध्य होतील.
धनु : शुभ रंग : केशरी | अंक : ५
काही अती हुषार मंडळी संपर्कात येतील, न मागता सल्ले देतील. ऐकावे जनाचे व करावे मनाचे हे योग्य.
मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : २
व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम रहाल. नेतृत्वाची संधी मिळेल.
कुंभ : शुभ रंग : आकाशी| अंक : १
नोकरीच्या ठीकाणी तुमचे महत्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारून त्या पूर्ण कराल.
मीन : शुभ रंग : मरून| अंक : ३
व्यावसायात मर्यादा ओळखूनच उलाढाली केलेल्या बऱ्या. अती आक्रमकतेने निराशा पदरी पडेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.