आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार

मंगळवार 12 जानेवारी रोजी मूळ नक्षत्र असल्यामुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. या 6 राशीच्या लोकांना दिवस धावपळीचा आणि धनहानीचा राहू शकतो. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...

मेष : शुभ रंग : सोनेरी| अंक : ३
कार्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावीच लागणार आहे.

वृषभ : शुभ रंग : हिरवा| अंक : ८
क्षुल्लक कारणाने घरातील थोरांशी मतभेद संभवतात. कुठलीही गोष्ट सहज साध्य नसून अथक परिश्रम गरजेचे आहेत. नवीन ओळखीत व्यवहार नकोत.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता| अंक : २
आज तुम्ही कारण नसताना दुसऱ्यांच्या भानगडीत डोकावणार आहात. एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्थी कराल.पत्नीस दिलेली वचने पाळाल.

कर्क : शुभ रंग : क्रीम| अंक : ६
बेरोजगारांची वणवण संपेल. मित्रांमध्ये रिकामटेकड्या चर्चेत काही वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे.

सिंह : शुभ रंग : चंदेरी|अंक : ९
आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत लक्षणीय फरक दिसेल. नवविवाहिताना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

कन्या : शुभ रंग : गुलाबी|अंक : ८
कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. दुसऱ्यास मदत करताना आधी स्वत:ची शिल्लक तपासणे गरजेचे.

तूळ : शुभ रंग : आकाशी| अंक : ७
अथक मेहनतीच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरूच राहील. भावंडांत सलोखा राहील.

वृश्चिक : शुभ रंग : जांभळा| अंक : १
सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. छान दिवस.

धनू : शुभ रंग : केशरी| अंक : ५
आज संयमाची गरज असून अति आक्रमकतेने घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. मुलांनी आज्ञेत राहावे.

मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ३
हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्यापूर्वी विचार आवश्यक.गृहिणींनी झाकली मूठ झाकलीच ठेवावी.

कुंभ : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ४
आज राशीच्या लाभातून चंद्रभ्रमण सुरू आहे. अपुरी स्वप्ने साकार होतील. विरोधकही शरण येतील.

मीन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
उद्योग-व्यवसायात प्रगतीरथ वेेगवान राहील. तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.मानसन्मानात वृद्धी होईल.

बातम्या आणखी आहेत...