आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • शुभ योगामध्ये होत आहे आजच्या दिवसाची सुरुवात

मंगळवार 12 मे रोजी उत्तराषाढा नक्षत्रामुळे शुभ नावाचा एक खास योग योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची साथ मिळेल. या राशीच्या लोकांच्या जुन्या अडचणी दूर होऊ शकतात. नवीन लोकांसोबत ओळख होण्याचे योग आहेत. नवीन गुंतवणूक आणि फायदेशीर सौदे होऊ शकतात. नोकरी करणा-या लोकांना अधिका-यांची मदत मिळू शकते. नियोजित आणि खास काम करायची असतील तर मंगळवार शुभ आहे. यासोबतच इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

  • मेष: शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९

आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य देणार आहात.अधिकार वापरण्याच्या योग्य संधी चालून येणार आहेत.आज मित्रमंडळीं बरोबर मात्र काहीतरी बिनसणार अाहे.

  • वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : १

घरात काहीतरी कारणाने वडीलधाऱ्यांंशी मतभेद होऊ शकतात. आपले म्हणणे त्यांना पटवून सांगायचा व्यर्थ खटाटोप न करता, त्यांच्या वयाचा मान राखा.

  • मिथुन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८

आज जोखमीची कामे टाळलेली बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. हातचे सोडून पळत्या मागे अजिबात धावू नका व कायद्याची चौकट मोडू नका.

  • कर्क : शुभ रंग : आकाशी | अंक : २

आज तुम्ही अत्यंत आनंदी, उत्साही व ताजेतवाने असाल. एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल व त्या संधीचे तुम्ही सोने कराल.    

  • सिंह : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८

नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढणार आहे. वरीष्ठ गोड बोलून तुमच्याकडून कामे करून घेतील. आज प्रक़ृतीकडे दुर्लक्ष नको. पत्नीची आज्ञा पाळणे हिताचे.

  • कन्या : शुभ रंग : क्रिम | अंक : ५

कार्यक्षेत्रात तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू राहील. तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्यच ठरणार आहेत. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. 

  • तूळ : शुभ रंग : लाल | अंक : २

अार्थिक बाजू उत्तम असेल. घरसजावटीच्या काही शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल. मुलांना दिलेले शब्द पाळू शकाल. वाहनाचीही काळजी घ्यावी लागेल. 

  • वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : ६

काही कौटुंबिक अडचणी तुम्हाला चिंताग्रस्त करतील. परंतु जोडीदाराच्या खंबीर सहकार्याने त्यावर सहज मात करता येईल. काही कारणास्तव प्रवास घडतील. 

  • धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७

आत्मविश्वासाने नव्या योजना राबवू शकाल. पैशाअभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील. गरजूंना मदत कराल स्पर्धकांना तुमचा हेवा वाटेल. 

  • मकर : शुभ रंग : निळा| अंक : ३

कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकावीत. हट्टीपणास लगाम घालून इतरांचे विचार ऐकून घ्यायची तयारी ठेवा. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकतील.

  • कुंभ : शुभ रंग : हिरवा | अंक : ४

आज काही मोठे खर्च दार ठोठावणार आहेत. अध्यात्मिक मार्गाकडे आज तुमचा कल राहील.विदेशाशी संबंधीत कामे यशस्वी होणार आहेत.

  • मीन : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६

बरेच दिवसांपासूनची तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होणार आहेत. काही भाग्यवान मंडळींना नव्या वाहनाच्या चाव्या मिळण्याचे योग अहेत.

बातम्या आणखी आहेत...