आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 13 ऑक्टोबर रोजी मघा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शुभ नावाचा खास योग तयार होत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे 12 पैकी या 8 राशीच्या लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

मेष: शुभ रंग : मोतिया| अंक : २
नोकरदारांना आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील.

वृषभ: शुभ रंग : सोनेरी| अंक : ८
आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय चांगले चालतील. विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील.कलाकारांना निर्मात्यांचे उंबरठे झिजवावे लागतील.

मिथुन : शुभ रंग : केशरी|अंक : १
ऑफिस कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे, वादविवाद होतील. आज गृहिणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा न ठेवलेली बरी.

कर्क : शुभ रंग : हिरवा|अंक : ९
आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मन:स्थितीही चांगली राहील.

सिंह :शुभ रंग : मरून| अंक : ४
आज तुमचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. देण्याघेण्याचे व्यवहार मात्र चोख ठेवावेत.

कन्या : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ५
काही दूरचे नातलग संपर्कात येणार आहेत.इम्पोर्ट-एक्स्पोर्टचे व्यवसाय तेजीत चालणार आहेत.

तूळ : शुभ रंग : चंदेरी| अंक : ७
जुन्या गुंतवणूकीतून चांगला लाभ मिळेल. दुरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाह जुळून येतील.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी| अंक : ६
कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीत प्रमोशनची चाहूल लागेल.अधिकारी वर्गाच्या अपेक्षा वाढतील.

धनु : शुभ रंग : जांभळा| अंक : ४
हितशत्रू सक्रिय आहेत. प्रत्येक निर्णय विचारांती घ्या. परिश्रमानेच यश सोपे होईल. दैवाची साथ तर आहेच.

मकर : शुभ रंग : गुलाबी| अंक : २
सहकार्याची अपेक्षा करूच नका. विराेधक सक्रिय असताना बिनचूक कामास प्राधान्य द्यावे.

कुंभ : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ३
घराबाहेर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील. एखाद्या मंगल कार्यात जोडीने हजेरी लावाल.

मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १
अतिश्रमांचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आरोग्याच्या क्षुल्लक तक्रारीही दुर्लक्षित करू नका. खाण्यावर नियंत्रण ठेवा.