आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी खास राहील हा योग
Advertisement
Advertisement

मंगळवार 14 जुलै रोजी अश्विनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे धृती नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग 12 पैकी 8 राशींसाठी चांगला राहील. धृती योग कुटुंब आणि कार्यक्षेत्रासाठी शुभ राहील. या योगाच्या प्रभावाने कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्या गोष्टीचा वाद चालू असेल तर तो आज संपुष्टात येईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

मेष : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८

आज तुम्हाला संयमाची गरज असून अती आक्रमकतेने घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. मुलांनी आज्ञेत रहावे.

वृषभ : शुभ रंग : तांबडा | अंक : ३ 

आज तुम्हाला काही फसव्या संधी चालून येतील. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्यापूर्वी विचार अवश्यक. गृहीणींना झाकली मूठ झाकलीच ठेवावी.

मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ७ 

एखाद्या नवीन व्यवसायाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज राशीच्या लाभातून चंद्रभ्रमण सुरू अाहे. अपूरी स्वप्ने साकार होतील.

कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : ५ 

उद्योग व्यवसायात प्रगतीरथ वेेगवान राहील. तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.आज तुमचा उच्च राहणीमानाकडे कल राहील.

सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५
 
कार्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. वरीष्ठांची मर्जी सांभाळावीच लागणार आहे.विरोधकांना आज चहा पाजून आपलेसे करावे लागेल.

कन्या : शुभ रंग : हिरवा | अंक : ३
 
क्षुल्लक कारणाने घरातील थोरांशी मतभेद संभवतात. कुठलीही गोष्ट सहज साध्य नसून अथक परिश्रम गरजेचे आहेत. नवीन ओळखीत व्यवहार नकोत.

तूळ : शुभ रंग : सोनेरी | अंक : १ 

आज तुम्ही कारण नसताना दुसऱ्यांच्या भानगडीत डोकावणार आहात. एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्ती कराल. पत्नीस दिलेली वचने पाळाल.

वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९
 
उद्दीष्ट साध्य करण्यासाठी काबाड कष्टांशिवाय दुसरा पर्याय नाही. बेरोजगारांची वणवण संपेल. मित्रांमधे आज काही वैचारीक मतभेद होण्याची शक्यता आहे.

धनू : शुभ रंग : लाल | अंक : ८
 
उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. नवोदीत कलाकारांना ग्लॅमर मिळेल. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय फरक दिसेल. नवविवाहीतांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

मकर : शुभ रंग : मरून| अंक : ६

मनाजोगत्या घटना तुमचे मनोबल वाढवतील. एखाद्या कौटुंबिक सोहळयात सहभागी व्हाल. दुसऱ्यास मदत करताना आधी स्वत:ची शिल्लक तपासणे गरजेचे.

कुंभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
 
भावंडात झालेले गैरसमज दूर होतील. अथक मेहनतीच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरू राहणार आहे. महत्वाच्या कामासाठी भटकंती होईल

मीन : शुभ रंग : आकाशी | अंक : २

अधुनिक रहाणिमानाची आवड जोपासता येईल. एखाद्या सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. गृहीणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. छान दिवस.

Advertisement
0