आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळवार 14 जून रोजी ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे साध्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...
मेष : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
वैवाहीक जिवनांत संध्याकाळी थोडेसे मतभेद होतील. विश्वासातील माणसाकडून विश्वासघात होऊ शकतो.
वृषभ : शुभ रंग : आकाशी | अंक : १
मोठे आर्थिक निर्णय उद्यावर ढकललेत तर बरे होईल. आज वैवाहीक जिवनात तिसऱ्या व्यक्तीस थारा नको.
मिथुन : शुभ रंग : निळा| अंक : ८
आवक पुरेशी असेल, तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे. आज आरोग्याची काळजी घ्यायला हवी.
कर्क : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
आज तुम्ही आपले आवडते छंद जपण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. अपूऱ्या स्वप्नांची पूर्तता होईल.
सिंह : शुभ रंग : पांढरा| अंक : ९
आप्तस्वकीयांसह मौजमजेत दिवस व्यतित होईल. खिशात पैसा खेळता राहील. किमती खरेदी कराल.
कन्या : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
मनोबल व आत्मविश्वास वाढेल. अनेक किचकट कामे मार्गी लागतील. मित्र खोटी स्तुती करतील.
तूळ : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागेल.आवक चांगली राहील. आज वाणीवर लगाम असुद्या.
वृश्चिक : शुभ रंग : मरून| अंक : ८
व्यावसायात स्पर्धेस तोंड देण्यासाठी जाहीरात वाढवावी लागेल. जुनी तत्व गुंडाळून ठेवावीत.
धनु : शुभ रंग : राखाडी| अंक : ५
धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. यथाशक्ती दानधर्म कराल. कुवतीबाहेर जबाबदाऱ्या मात्र स्विकारू नका.
मकर : शुभ रंग : क्रिम| अंक : ५
व्यावसायिक अडचणींवर सहज मात करु शकाल. आज तुम्ही सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील.
कुंभ : शुभ रंग : हिरवा| अंक : २
आज तुम्ही रिकाम्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य द्यायला हवे. मित्रांना दोन हात लांबच ठेवणे गरजेचे आहे.
मीन : शुभ रंग : केशरी| अंक : ३
काही मनाविरूध्द घटना मनास बेचैन करतील. आज इतरांनी दिलेल्या अश्वासनांवर अवलंबून राहू नका.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.