आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 15 जून रोजी आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. या 6 राशीच्या लोकांना दिवस धावपळीचा आणि धनहानीचा राहू शकतो. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...

मेष: शुभ रंग : लाल | अंक : ३
नोकारी व्यवसायात थोड्याफार अडचणींचा सामना करावा लागेल. वरीष्ठांनी दिलेली अश्वासने फार मनावर घेऊ नका. आज उपासनेची प्रचिती येईल.

वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ५
नोकरीच्या ठीकाणी अधिकार योग चालून येतील. उच्चशिक्षित मंडळींना मनाजोगत्या नोकऱ्या चालून येतील. व्यावसायिकांची बाजारातील पत वाढेल.

मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ८
घरातील वडीलधाऱ्यांच्या विचाराने वागलेले हिताचे ठरेल. ज्येष्ठांनी गाठीशी असलेली पुंजी जपुन वापरावी. केवळ मोठेपणासाठी खर्च करणे टाळा. वाद नकोत.

कर्क : शुभ रंग : राखाडी | अंक : ९
काही मान अपमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागणार आहे. रागावर ताबा ठेवणे गरजेचे राहील.आज काही येणी असतील तर मात्र वसूल होऊ शकतील.

सिंह : शुभ रंग : भगवा | अंक : ८
दैनंदीन कामे फारच कंटाळवाणी वाटतील. एखाद्या करमणूकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. मुलांसाठी वस्त्रखरेदी कराल. आज तुमचा गृहसौख्याचा दिवस.

कन्या : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६
शिक्षण क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय तेजीत चालतील.विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील.कलाकारांना मात्र प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

तूळ: शुभ रंग : मोरपंखी | अंक : ७
आज तुम्ही फक्त नाकासमोर चालणे गरजेचे. अती आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होऊ शकेल. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजारीच मदतीस येतील.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ४
नोकरी व्यवसायात उत्साहाचे वातावरण राहील. काही नवे हितसंंबंध जुळून येतील. विवाहेच्छूकांना आशेचा किरण दिसेल. आप्तस्वकीय तुमच्या प्रभावात असतील.

धनू : शुभ रंग : डाळिंबी| अंक : १
राशीच्या धनस्थानातून चंद्रभ्रमण सुरू असल्याने पैशाची कमतरता भासणार नाही. तुमचा कार्यउत्साह वाढेल. खिशात पैसा खेळता असल्याने आज म्हणाल ती पूर्व.

मकर : शुभ रंग : पांढरा| अंक : ५
आर्थिक उन्नत्तीच्या काही नव्या संधी दार ठोठावतील.महत्वपूर्ण निर्णय घेताना द्विधा मन:स्थितीस लगाम घालणे गरजेचे राहील. पत्नीचा सल्ला अवश्य घ्या.

कुंभ : शुभ रंग : हिरवा | अंक : २
कार्यक्षेत्रात काही गुप्त शत्रू सक्रिय असू शकतात.आपल्या भावी योजना इतक्यात उघड करू नका.आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करुच नका.

मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ३
कार्यक्षेत्रात काही प्रतिकूल घटनांनी नैराश्य जाणवेल. महत्वाचे निर्णय विचारांती घ्या. हट्टीपणास आवर घाला. अडचणीच्या प्रसंगी दैवाची साथ आहेच.

बातम्या आणखी आहेत...