आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 19 जानेवारी रोजी उत्तर भाद्रपदा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती शिवा नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...

मेष: शुभ रंग: तांबडा| अंक : ३
आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा असणार आहे.महत्वपूर्ण निर्णय जाणकार व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्या.

वृषभ: शुभ रंग: क्रिम| अंक : ७
काही दूरावलेल्या नातेसंबंधांत सुधारणा होईल. पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस.

मिथुन : शुभ रंग : डाळिंबी| अंक : १
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधकांचा जोर आता कमी होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल. मित्रांच्या मदतीस धाऊन जाणार आहात.

कर्क : शुभ रंग : पिस्ता| अंक : ६
आज तुमचे मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील, संयम ठेवा. सत्संगाने मानसिक बळ मिळेल.

सिंह :शुभ रंग : लाल|अंक : ८
आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.

कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ९
कौटुंबिक स्तरावर काही आनंदी घटना घडतील. एकतर्फी प्रेमाला आज समोरुन होकार मिळू शकेल.

तूळ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ७
नोकरदारांनी साहेबांना एकदा गुड मॉर्निंग करणे हिताचे आहे. घरात जोडीदारही आपल्याच मतावर ठाम राहील.

वृश्चिक : शुभ रंग : पिवळा| अंक : ५
शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. छान दिवस.

धनु : शुभ रंग : भगवा| अंक : २
कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर सुसंवादाने मिटू शकतील. गृहीणींनी झाकली मुठ झाकलीच ठेवावी.

मकर : शुभ रंग : जांभळा| अंक : ४
आज जरा मानसिक अस्वस्थता राहील. काही महत्वाची मेल्स येणार आहेत. दुपरानंतर प्रवासास निघाल.

कुंभ : शुभ रंग : निळा| अंक : १
तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठीतांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील.

मीन : शुभ रंग : सोनेरी| अंक : ३
प्रभावी वक्तृत्वाने आज समोरच्यास प्रभावित कराल. महत्वाचे व्यावसायिक करार करण्यासाठी आज योग्य दिवस. हरवलेले गवसेल.

बातम्या आणखी आहेत...