आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 2 फेब्रुवारी रोजी हस्त नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे धृती नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग 12 पैकी 8 राशींसाठी चांगला राहील. धृती योग कुटुंब आणि कार्यक्षेत्रासाठी शुभ राहील. या योगाच्या प्रभावाने कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्या गोष्टीचा वाद चालू असेल तर तो आज संपुष्टात येईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...

मेष : शुभ रंग : पांढरा| अंक : २
बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. कामगारांच्या रास्त मागण्या मान्य होतील. जास्त दगदग टाळावी.

वृषभ : शुभ रंग : तांबडा| अंक : ४
विविध मार्गाने आलेला पैसा विविध मार्गाने जाईल.आपला बडेजाव दाखवण्यासाठी खर्च कराल. आज सहकुटुंब मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता| अंक : १
जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. भावंडात प्रेम राहील. गृहिणी स्वत:च्या आवडीस प्राधान्य देतील.मुले पालकांच्या आज्ञेत राहतील. आशादायी दिवस.

कर्क : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
दैनंदिन कामांचा कंटाळा येईल. इतरांना न जमणारे काहीतरी वेगळेच करण्याकडे तुमचा कल राहील.

सिंह : शुभ रंग : गुलाबी| अंक : ३
कार्यक्षेत्रात विरोधकांचा विरोध मावळेल. चांगले हितसंबंध निर्माण होतील. पुरेशी बचत करता येईल.

कन्या : शुभ रंग : भगवा|अंक : ५
काही मनाजोगत्या घटना घडल्याने तुमचा कार्यउत्साह वाढेल. महत्त्वाच्या अग्रेसर राहाल.

तूळ : शुभ रंग : आकाशी| अंक : ९
आज मर्यादेबाहेर आर्थिक धाडस नकाे. कर्ज प्रस्ताव रखडतील. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

वृश्चिक : शुभ रंग : हिरवा| अंक : ६
प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. यशाकडे वाटचाल चालूच राहील. अाकस्मिक धनलाभाची शक्यता.

धनू : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ९
आत्मविश्वास व स्वावलंबन गरजेचे आहे. ‘ऐकावे जनाचे व करावे मनाचे’ हेच तत्त्व हिताचे राहील.

मकर : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेल्या शाबासकीस बळी जाऊ नका. उपासकांना एखादी प्रचिती येईल.

कुंभ : शुभ रंग : केशरी| अंक : ८
आज तुम्ही आपल्याच प्रेमात राहा. कुणालाही सल्ले द्यायच्या भानगडीत पडू नका. कोणतीही रिस्क नको.

मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : १
आज कुठेही स्पर्धा अटळ आहे. खेळाडूंना अटीतटीची झुंज द्यावी लागणार आहे. वैवाहिक जीवनात आय लव्ह यू म्हणूनच टाका.

बातम्या आणखी आहेत...