आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 2 फेब्रुवारी रोजी हस्त नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे धृती नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग 12 पैकी 8 राशींसाठी चांगला राहील. धृती योग कुटुंब आणि कार्यक्षेत्रासाठी शुभ राहील. या योगाच्या प्रभावाने कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्या गोष्टीचा वाद चालू असेल तर तो आज संपुष्टात येईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...

मेष : शुभ रंग : निळा| अंक : ५
नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर होतील. येणी वसूल होतील.

वृषभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ६
महत्त्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा. आज स्वावलंबन महत्त्वाचे राहील. कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल.

मिथुन : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
आज स्वत:चे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. अाधुनिक राहणीमानाकडे कल राहील. चर्चा आज फक्त वादास निमंत्रण देईल. संयम ठेवा.

कर्क : शुभ रंग : मोतिया| अंक : ३
विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार.

सिंह : शुभ रंग : क्रीम|अंक : १
चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. मनाविरुद्ध काही घटना मनास बेचैन करतील.

कन्या : शुभ रंग : पिस्ता|अंक : २
सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाहाविषयी बोलणी करायची असतील दिवस योग्य.

तूळ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ८
तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. दुपारनंतर हरवलेले गवसेल.

वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी| अंक : ७
उत्साही व आनंदी असा आजचा दिवस आहे. काही दुरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल.

धनू : शुभ रंग : पांढरा| अंक : ९
आज नोकरीत वाढीव जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकारून स्वत:चे वर्चस्व सिद्ध कराल.

मकर : शुभ रंग : सोनेरी| अंक : ४
संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील. आज नास्तिक मंडळीही गरजेपुरती अाध्यात्मिक होतील.

कुंभ : शुभ रंग : लाल| अंक : ३
व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकानदारांच्या गल्ल्यात लक्षणीय वाढ होईल. गाडी जपून चालवा.

मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ८
कौटुंबिक जीवन समाधानी असेल. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. जोडीदारास सरप्राइज गिफ्ट द्याल.

बातम्या आणखी आहेत...